कोलकाता - श्रीलंकेविरोधात इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली शुन्यवर बाद झाला. आणि आगळावेगळा विक्रम त्याच्यानावार जमा झाला आहे. भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. लोकेश राहुल आणि शिखर धवन या सलामीवीरांसह कर्णधार विराट कोहलीसुद्धा झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला आहे. कर्णधार विराट कोहलीला वैयक्तिक शून्य धावसंख्येवर लकमलनं बाद केलं.
कर्णधार असताना एका वर्षभरात सर्वाधिक वेळा शुन्य धावसंखेवर बाद होण्यामध्ये विराट संयुक्तरित्या कपिलदेवसह पहिल्या स्थानावर आहे. 1983 मध्ये कपिल देव पाचवेळा शुन्य धावसंखेवर बाद झाला होता. 2017 या वर्षात कसोटी, वन-डे आणि टी-20 मध्ये विराट कोहली आतापर्यंत पाचवेळा शुन्यावर बाद झाला आहे. कपिल आणि विराटशिवाय बिशन सिंह बेदी, सौरव गांगुली व एमएस धोनी 4-4 वेळा एका वर्षातमध्ये शुन्य धावांवर बाद झाले आहेत.
कर्णधार असताना वर्षभरात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारे खेळाडू -5 - कपिल देव, 19835* - विराट कोहली, 20174 - बिशन सिंह बेदी, 19764 - सौरव गांगुली, 2001 और 20024 - एमएस धोनी, 2011 पहिल्या कसोटीत भारताची दयनिय अवस्था - पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास उशीर झाला असून, श्रीलंकेने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. लोकेश राहुल आणि शिखर धवन या सलामीवीरांसह कर्णधार विराट कोहलीसुद्धा झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव अडचणीत आला आहे. सुरंगा लकमलने पहिल्याच षटकात लोकेश राहुलची विकेट काढत भारताला पहिला धक्का दिला. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. त्यापाठोपाठ शिखर धवनला 8 धावांवर माघारी धाडत लकमलने श्रीलंकन संघाला दुसरे यश मिळवून दिले. कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा निराशा केली. तो वैयक्तिक शून्य धावसंख्येवर लकमलची तिसरी शिकार झाला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या 3 बाद 17 धावा झाल्या होत्या. चेतेश्वर पुजारा 8 धावांवर खेळत होता. तर अजिंक्य रहाणेने अद्याप खाते उघडलेले नव्हते.
टेस्टमध्ये विराटसाठी कोलकाता अनलकी -भारतासह जगातील कोणत्याही मैदानावर खोऱ्यानं धावा खेचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला कोलकाता मैदानात आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. कसोटीमध्ये विराटसाठी इडन गार्डन्सहे अनलकीच राहिल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होतय. विराट कोहलीनं इडन गार्डन्सवर आतापर्यंत तीन कसोटी सामन्यातील सहा डावात फक्त 83 धावांच करता आल्या आहेत. यावेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 आहे. भारतीय रनमशीन विराट कोहलीनं वन-डे सामन्यात इथ धावांचा पाऊस पाडला आहे. वनडेमध्ये विराटनं इडन गार्डन्सवर 54 च्या सरासरीनं धावा काढल्या आहेत. पण कसोटी सामन्यात त्याला लौकीकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे श्रीलंकेविरोधात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांची सरबत्ती करुन अनलकी टॅग काढण्याचा प्रयत्न करेल.
1982 पासून भारतात एका विजयाच्या प्रतिक्षेत आहे लंका -कोलकाताच्या मैदानावरील भारतीय संघाच्या विक्रमावर नजर टाकल्यास भारताला हे मैदान लकी असल्याचे पहायला मिळते. या मैदानावर भारतानं खेळेलेल्या 40 सामन्यातील 12 मध्ये विजय तर 9 मध्ये पराभव स्विकारला आहे. तर 19 सामने अनिर्णित राहिलं आहेत. भारतासाठी एक आनंदाची बाब म्हणजे, श्रीलंकाला भारतात आतापर्यंत एकही कसोटी विजय मिळवता आलेला नाही. लंकेनं 1982 मध्ये सर्वात प्रथम भारत दौरा केला होता. तेव्हापासून त्यांना आतापर्यंत एकही विजय मिळता आला नाही. त्यामुळे लंकेच्या संघावर मानसिक दबाव असणार यात कोणतीही शंका नाही. घरच्या मैदानावर लंकेविराधात भारतानं आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये दहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर सात सामने अनिर्णित राहिलेत.