Join us  

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ डिसेंबरपासून पहिली कसोटी;स्थानिक माध्यमांनी दिली वेळापत्रकाची माहिती

सेव्हन न्यूज डॉट कॉम आणि सिडनी मॉर्निंग हेरॉल्डनुसार चार कसोटी सामन्यांचे वेळापत्रक ठरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 10:56 PM

Open in App

मेलबोर्न : स्थानिक माध्यमांच्या मते, भारतीय संघ या वर्षाअखेर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार असून क्रिकेट आॅस्ट्रेलियाने दौºयाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. यानुसार पहिली कसोटी ब्रिस्बेन मैदानावर ३ डिसेंबरपासून खेळविली जाईल.

सेव्हन न्यूज डॉट कॉम आणि सिडनी मॉर्निंग हेरॉल्डनुसार चार कसोटी सामन्यांचे वेळापत्रक ठरले आहे. वृत्तानुसार क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सीईओ केविन रॉबर्टस हे याची घोषणा शुक्रवारी करतील. दौºयात भारतीय संघासाठी विलगीकरणाची कुठलीही योजना नसेल. कोरोना महामारीमुळे हा दौरा रद्द केला जाईल, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती.

सेव्हन न्यूज डॉट कॉमने लिहिले की क्रिकेट आॅस्ट्रेलियाने जे वेळापत्रक तयार केले, त्यानुसार पहिली कसोटी ब्रिस्बेन येथे ३ डिसेंबरपासून, दुसरी कसोटी अ‍ॅडिलेड येथे ११ डिसेंबरपासून तिसरी कसोटी मेलबोर्न येथे २६ डिसेंबरपासून आणि चौथी तसेच अखेरची कसोटी ३ जानेवारीपासून सिडनी येथे खेळविली जाईल. अ‍ॅडिलेड येथे दुसरा सामना दिवस-रात्र असेल असे मानले जात आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया