कोलकाता : भारत- श्रीलंका यांच्यात आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. संपूर्ण पाच दिवस खेळ होणार की नाही, ही शंका कायम असून सामन्याच्या पूर्वसंध्येला पावसाचे सावट असल्यामुळे उभय संघ सरावापासून वंचित राहिले. तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी लय कायम राखण्याच्या इराद्यानेच ‘कोहली अॅन्ड कंपनी’ मैदानात उतरणार आहे. श्रीलंका संघापुढे पराभवाची शृंखला मोडीत काढण्याचे आव्हान असेल.लंका दौ-यात भारताने सर्व प्रकारांत विजय नोंदवित ९-० असे ‘क्लीन स्वीप’ केले. नंतर लंकेने यूएईत पाकवर २-० ने विजय नोंदवित पराभवाची जखम भरून काढली होती. भारतीय संघ यानंतर दोन महिन्यांचा द. आफ्रिका दौरा करणार असल्याने या दौºयाकडे गांभीर्याने पाहत आहे. जुलै- आॅगस्टमधील कसोटी मालिकेनंतर भारताने १३ वन-डे आणि सहा टी-२० सामने खेळले. तरीही खेळाडूंना कसोटीसाठी सज्ज होण्यास त्रास होणार नाही. संघातील अनेक जण आपापल्या राज्याकडून रणजी सामन्यात खेळले आहेत.पावसाचा जोर कायमहवामान खात्याने १८ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. तरीही उभय संघांचा आत्मविश्वास कायम आहे. ईडनच्या हिरव्यागार खेळपट्टीवर भुवनेश्वरचे खेळणे निश्चित मानले जाते. संघात ३ वेगवान आणि २ फिरकी गोलंदाज असतील. भुवीने २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पाच गडी बाद केले होते. त्याच्या सोबतीला उमेश यादव आणि महंमद शमी असतील. फलंदाजीत मुरली विजयचे पुनरागमन होऊ शकते. चेतेश्वर पुजारा मधल्या फळीचा आधार असेल. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत आश्विन दोन्ही आघाड्यांवर सरस ठरू शकतो.मॅथ्यूज चौथ्या स्थानावर खेळणारज्येष्ठ फलंदाज अँजेलो मॅथ्यूज चौथ्या स्थानावर फलंदाजीला येणार, अशी माहिती लंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलने दिली. मॅथ्यूजच्या अनुभवाचा आम्हाला लाभ होईल, अशी आशा वर्तवित चंडीमल म्हणाला, ‘भारताविरुद्ध कोलंबोत शतक झळकविणारा मॅथ्यूज आॅगस्ट २०१५ पासून कसोटीत शतक झळकवू शकला नाही. तो भारताविरुद्ध गोलंदाज नव्हे तर फलंदाज म्हणून खेळणार आहे.’लंकेच्या विजयाचा दुष्काळ१९८२ पासून लंकेने भारतात ३५ वर्षांत १६ कसोटी सामने खेळले, पण यापैकी एकही जिंकला नाही. अनुभवहीन कर्णधार दिनेश चंडीमलच्या नेतृत्वात हा संघ विजयाची आशा बाळगून आहे. त्यासाठी अँजेलो मॅथ्यूज आणि रंगाना हेराथ या गोलंदाजांना अप्रतिम कामगिरी करावी लागेल. मॅथ्यूजकडून धावांचीदेखील संघाला अपेक्षा आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पहिली कसोटी आजपासून : ईडन गार्डनवर पावसाचे सावट
पहिली कसोटी आजपासून : ईडन गार्डनवर पावसाचे सावट
भारत- श्रीलंका यांच्यात आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. संपूर्ण पाच दिवस खेळ होणार की नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 4:41 AM