Join us  

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल) 13व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:28 AM

Open in App

इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल) 13व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली. लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. आयपीएलचे आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शारजा, अबुधाबी आणि दुबईत होणार आहे. सरकारने मागच्या आठवड्यात बीसीसीआयला तत्त्वत: मंजुरी दिली होती, मात्र लेखी प्रत मिळू शकली नव्हती. भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने यंदा यूएईत आयोजन होत आहे. 

IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल 

बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR 

भारतातील कुठल्याही क्रीडा संस्थेला स्थानिक स्पर्धा विदेशात करायची झाल्यास गृह, विदेश आणि क्रीडा मंत्रालयाची परवानगी घेणे अनिवार्य असते. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ‘सरकारकडून मंजुरी मिळाल्याने आम्ही आता एमिरेटस् बोर्डाला कळविले आहे. लेखी मंजुरीची माहिती आता सर्व आठही संघांना देत आहोत.’ अनेक संघ २२ ऑगस्ट रोजी यूएईकडे रवाना होणार आहेत. परवानगीआधी त्यांना २४ तासात दोनदा आरटी पीसीआर चाचणी करावी लागेल. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडू यूएईकडे रवाना होऊ शकतील.

ब्रिजेश पटेल यांच्या घोषणेनंतर आता सर्वांना उत्सुकता लागली आहे, ती आयपीएल वेळापत्रकाची... सोशल मीडियावर सध्या एक वेळापत्रक व्हायरल झालं आहे. त्यानुसार 19 सप्टेबंरला गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यास सलामीचा सामना सायंकाळी 7.30 वाजता रंगणार असल्याचे कळतं आहे. पण, आयपीएल किंवा बीसीसीआय यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेले वेळापत्रक खोटं आहे.

 

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआय