Hardik Pandya Team India: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी 2022 हे वर्ष खूप छान आहे. सर्वप्रथम, हार्दिकने त्याच्या कर्णधारपदाचा आणि IPL 2022 मध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. या नेत्रदीपक कामगिरीनंतर हार्दिकने पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले. संघात पुनरागमन केल्यापासून हार्दिकने सातत्याने चांगला खेळ दाखवला आहे. आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात हार्दिक पांड्याचीही निवड झाली आहे. तशातच, हार्दिक पांड्याने भविष्यात टी२० संघाचे कर्णधारपद भूषवल्यास कोणालाही आश्चर्य वाटू नये, अशी भविष्यवाणी न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिसने केली.
हार्दिक पांड्याने गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. IPL 2022 मध्ये हार्दिक पांड्याने 'गुजरात टायटन्स'ला ट्रॉफी जिंकून दिली. जूनमध्ये घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेदरम्यान पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले होते. अनेक नियमित खेळाडूंच्या अनुपस्थितीत, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने जूनमध्ये आयर्लंडविरुद्ध २-०ने टी२० मालिका जिंकली आणि फ्लोरिडा, युनायटेड स्टेट्स येथे पाचव्या टी२० मध्ये भारताने वेस्ट इंडिजवर ८८ धावांनी मोठा विजय मिळवला. यानंतर पांड्या भविष्यात टी२० चा कर्णधार बनू शकतो, अशी भविष्यवाणी स्टायरिसने केली.
"हार्दिकबद्दलची चर्चा अतिशय रंजक आहे. कारण सहा महिन्यांपूर्वीपर्यंत कोणीही याची कल्पनाही केली नसेल की तो संघात इतकी महत्त्वाची भूमिका बजावेल. हार्दिकने सर्वांना प्रभावित केले आहे. फुटबॉलमध्ये अनेकदा खेळाडूंना चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्वाच्या आधारे कर्णधार बनवले जाते, जेणेकरून त्यांचा खेळ दाखवता येतो. त्यामुळे मला हार्दिक पांड्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवलेली पाहायची आहे", असे स्टायरिस म्हणाला.
Web Title: Former Cricket Scott Styris believes one should not be surprised if Hardik Pandya will be captaining Team India T20 side in future
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.