जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल 'वॉर'!

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भारतीय जनता पार्टिचा सदस्य गौतम गंभीरने पुन्हा एकदा ट्विटरवरून जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 11:12 AM2019-04-10T11:12:50+5:302019-04-10T11:13:08+5:30

whatsapp join usJoin us
Gautam Gambhir - Mehbooba Mufti's Social War 'on Jammu-Kashmir issue! | जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल 'वॉर'!

जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल 'वॉर'!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भारतीय जनता पार्टिचा सदस्य गौतम गंभीरने पुन्हा एकदा ट्विटरवरून जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली आहे. मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरला लागलेला 'डाग' असल्याची बोचरी टीका गंभीरने केली. यानंतर गंभीर आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली. अखेरीस मेहबूबा मुफ्ती यांनी गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले. 

भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात 370 कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर मुफ्ती यांनी टीका केली. त्या म्हणाल्या,''जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संविधान लागू होणार नाही आणि भारतीयांना हे समजत नसेल तर देशच नष्ट होईल.''



त्यावर नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या गंभीरने उत्तर दिले की,''हा भारत आहे आणि तुमच्या सारखा डाग नाही, जो सहज गायब होईल.''

मेहबूबा मुफ्तींनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,''तुझ्या क्रिकेट कारकिर्दीप्रमाणे भाजपातील राजकीय कारकीर्द निराशाजनक राहू नये, अशी आशा व्यक्त करते. 

 
 त्यावर गंभीर उत्तरला,''तुम्ही मला अनब्लॉक केले. माझ्या ट्विटला उत्तर देण्यासाठी तुम्हाला दहा तास लागले.''

 
 

 

Web Title: Gautam Gambhir - Mehbooba Mufti's Social War 'on Jammu-Kashmir issue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.