ढाका - वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धुमधडाका कामय आहे. सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या गेलने या स्पर्धेतील एका सामन्यात टी-20 क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. गेलने टी-20 क्रिकेटमध्ये अजून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. बांगलादेश प्रीमियर लीगच्या अंतिम लढतीत रंगापूर रायडर्सकडून ढाका डायनामाईट्सविरुद्ध खेळताना ख्रिस गेलने तब्बल 18 षटकार ठोकले. एका टी-20 लढतीत एकट्या खेळाडूने ठोकलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. याआधी एका सामन्यात सर्वाधिक 17 षटकार ठोकण्याचा विक्रम गेलच्याच नावावर होता. त्याने आज 18 षटकार ठोकत स्वत:चार विक्रम मोडीत काढला. याचदरम्यान, गेलने आपले शतक पूर्ण करताना 69 चेंडूत 146 धावा तडकावल्या. टी-20 क्रिकेटचा बादशहा समजल्या जाणाऱ्या गेलचे टी-20 मधील हे 20 शतक ठरले. टी-20 क्रिकेटमध्ये 20 शतके फटकावणारा गेल हा एकमेव फलंदाज आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पुन्हा 'गेल'धडाका! केला टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम
पुन्हा 'गेल'धडाका! केला टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धुमधडाका कामय आहे. सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या गेलने या स्पर्धेतील एका सामन्यात टी-20 क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 12:00 AM