टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि पत्नी गीता बस्रा हे पुन्हा एकदा आई-बाबा झाले. गीतानं शनिवारी मुलाला जन्म दिला. भज्जीनं सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली. हरभजन सिंगनं २०१५ साली अभिनेत्री गीता बसरासह लग्न केलं होतं आणि २०१६मध्ये त्यांच्या घरी नन्ही परीचं आगमन झालं होतं. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव हिनाया असं आहे.
गीता अभिनेत्री आहे. 2006 मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचा सिनेमा ‘दिल दिया है’मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर 2007 मध्ये ती पुन्हा इमरानसोबत ‘द ट्रेन’मध्ये झळकली होती. हरभजनने गीताला ‘वो अजनबी’ गाण्यात पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला आवडली होती. युवराज सिंगच्या मदतीने त्याने गीताचा नंबर शोधला. गीताला मेसेज करत तिला कॉफी डेटवर बोलवले होते. गीताने 3 ते 4 दिवस त्याच्या मेसेजचा रिप्लॉय दिला नव्हता. यानंतर दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. 2015 मध्ये हरभजन आणि गीताने मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते.