चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स शुक्रवारी यूएईला रवाना होणार आहे, पण अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंग वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत जाणार नाही. तो दोन आठवड्यांनंतर संघासोबत जुळेल. सीएसकेच्या अधिकाऱ्याने सांगितले, ‘हरभजन वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत जाणार नाही. तो दोन आठवड्यात संघासोबत जुळेल.’ तो चेन्नईत झालेल्या संक्षिप्त शिबिरातही सहभागी झाला नव्हता.
अष्टपैलू रवींद्र जडेजा व शार्दुला ठाकूर वैयक्तिक कारणांमुळे शिबिरात सहभागी झाले नाहीत. ठाकूर बुधवारी संघासोबत जुळला तर जडेजा आज सायंकाळी येथे दाखल झाला. अन्य खेळाडू १५ आॅगस्टपासून गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीच्या मार्गदर्शनाखाली येथे सराव करीत आहेत. आयपीएल १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळली जाणार आहे. दरम्यान, ४० वर्षीय स्टार फिरकीपटू हरभजनची आई आजारी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तो दोन आठवड्यानंतर संघासोबत जुळेल, अशी सीएसकेला आशा आहे.
>सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह
आयपीएलपूर्वी सीएसकेसाठी एक दिलासा देणारे वृत्त आहे. कोविड-१९ चाचणीत सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आहे. यूएईला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली.
Web Title: Harbhajan will join CSK in two weeks
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.