Join us  

हर्षा भोगलेंनी धरले मैदान्यातील राड्याला पंचांनाच जबाबदार

पंचंच जेव्हा निर्णय देताना चुकतात तेव्हा खेळाडूंनी पाहायचे तरी कोणाकडे, असा सवाल निदाहास ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना नक्कीच पडला असेल. समालोचक हर्षा भोगले यांनी नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 4:37 PM

Open in App
ठळक मुद्देबांगलादेशच्या खेळाडूंनी जे केले त्याचे समर्थन करता येणार नाही, पण या साऱ्यामध्ये दोषी आहेत मैदानावरील पंच, असा स्ट्रेट ड्राइव्ह भोगले यांनी लगावला आहे.

श्रीलंका : पंचांचा निर्णय अंतिम राहील, हे वाक्य साऱ्याच क्रीडा प्रेमींसाठी परवलीचेच. पण पंचंच जेव्हा निर्णय देताना चुकतात तेव्हा खेळाडूंनी पाहायचे तरी कोणाकडे, असा सवाल निदाहास ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंना नक्कीच पडला असेल. समालोचक हर्षा भोगले यांनी नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवले आहे. मैदान्यातील राड्यासाठी भोगले यांनी मैदानावरील पंचांना दोषी ठरवले आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील अखेरच्या षटकामध्ये मैदानात आणि त्यानंतर ड्रेसिंगरुमध्ये चांगलाच राडा झालेला पाहायला मिळाला. बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदान डोक्यावर घेतले होते. पण बांगलादेशच्या खेळाडूंनी जे केले त्याचे समर्थन करता येणार नाही, पण या साऱ्यामध्ये दोषी आहेत मैदानावरील पंच, असा स्ट्रेट ड्राइव्ह भोगले यांनी लगावला आहे.

" बांगलादेशच्या खेळाडूंनी जे काही केले त्याचे समर्थन मी नक्कीच करणार नाही. पण बांगलादेश सामना जिंकायच्या जवळ येऊन ठेपला होता. त्यावेळी जर असे प्रकार घडत असतील तर खेळाडू कोणते कृत्य करतील, हे सांगता येणार नाही. पण हा सर्व अनर्थ टाळता आला असता. जर पंचांनी जेव्हा पहिला बाऊन्स टाकला तेव्गा गोलंदाजाला सांगितले असते तर त्याने दुसरा बाऊन्सर टाकला नसता. त्यामुळे या प्रकरणात पहिले जर कोणी दोषी असतील तर ते म्हणजे पंच," असे भोगले यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८