नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल याच्या चेहºयावर ठोसा मारण्याची कधीकाळी धमकी दिली होती. ही घटना २००४ च्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान घडली. पार्थिवने गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना हा खुलासा केला.
पार्थिव म्हणाला, ‘ब्रिस्बेनच्या मैदानावर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मी मैदानावर होतो. त्याआधी शतक पूर्ण करणाºया हेडनला इरफान पठाणने बाद केले होते. हेडनजवळून जात असताना मी त्याला छेडले. माझे वागणे त्याला आवडले नाही. हेडनने मला खडेबोल सुनावले. हेडन माझ्यावर फार नाराज होता. ड्रेसिंग रूममध्ये उभे राहून पुन्हा अशी हरकत केली तर तुझ्या चेहºयावर ठोसा हाणेन, असे पुटपुटला. मी त्याची माफी मागितली तेव्हा काही वेळ माझ्याजवळ उभा राहिल्यानंतर तो निघून गेला.’
या घटनेच्या चार वर्षांनंतर पार्थिव आणि हेडन दोघे आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळण्यास एकत्र आले. आयपीएलनंतर हेडनने मला ऑस्ट्रेलियातील त्याच्या घरी भोजनासाठीदेखील निमंत्रित केले होते. ब्रिस्बेन येथे मला हेडनच्या हातून मार खावा लागला असता; मात्र त्यानंतर आमच्यात चांगली मैत्री झाली. सीएसकेसाठी आम्ही अनेक सामने एकत्र खेळल्याचे पार्थिव म्हणाला.
Web Title: Hayden had threatened to punch Parthiv in the face
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.