भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) ऑल राऊंडर म्हणाचे का?; असा सवाल केला. हार्दिक गोलंदाजीच करत नाही, त्यामुळे त्यांनी हा सवाल केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिकनं दोनच सामन्यात गोलंदाजी केली. भारताला या सामन्यात साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतूनही वगळले गेले.
''एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यानं फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. तो गोलंदाजी करत नाहीए, मग त्याला ऑल राऊंडर म्हणायचे का?. त्याला गोलंदाजी करू द्या, दुखापतीतून पूर्णपणे सावरू द्या,''असे कपिल देव यांनी Royal Calcutta Golf Courseला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. ते पुढे म्हणाले,''हार्दिक संघासाठी अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे, पण त्याला गोलंदाजीसाठी अनेक सामने खेळायला हवेत आणि कामगिरीवर खरं उतरायला हवं. मग त्याला आपण ऑल राऊंडर म्हणूया.''
राहुल द्रविड हा मुख्य प्रशिक्षक म्हणून खूप यशस्वी होईल, असेही कपिल देव म्हणाले. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच मालिकेत टीम इंडियानं ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडनवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत तो संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर आहे. ''तो चांगला माणूस व क्रिकेटपटू आहे. क्रिकेटपटूपेक्षा तो मुख्य प्रशिक्षक म्हणून आणखी चांगली भूमिका पार पाडेल. क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी कुणीच करू शकत नाही. मी आता फिंगर क्रॉस केली आहेत,''असे कपिल देव म्हणाले. यावेळी कपिल देव यांनी आर अश्विन व रवींद्र जडेजा हे त्यांचे आवडते ऑल राऊंडर असल्याचे सांगितले.