IPL 2021, MS Dhoni: कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं महेंद्रसिंग धोनीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. चेन्नईला यंदाचं जेतेपद जिंकून देणं हेच धोनीचं मुख्य उद्दीष्ट आहे आणि त्याच दृष्टीनं तो खेळताना दिसतो आहे, असं हरभजन म्हणाला. (He will want to leave CSK on a high note" - Harbhajan Singh on MS Dhoni's approach to second leg of IPL 2021)
"येत्या तीन वर्षात मला जगातील सर्वोत्तम फिनिशर व्हायचंय"
हरभजन सिंग यानं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धोनीचं आयपीएलचं हे यंदाचं शेवटचं सीझन असल्याची शक्यता वर्तवली आहे. "धोनी सध्या मेन्टॉरच्या भूमिकेत मला दिसत नाही. तो संघाचा कर्णधार म्हणूनच कामगिरी उंचावण्यासाठी कठरो परिश्रम करत आहे. संघाला यंदाचं जेतेपद जिंकून देण्यासाठी तो प्रयत्न करतोय. कारण पुढचं सीझन तो आयपीएलमध्ये खेळू शकेल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे शेवट गोड करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे", असं हरभजन सिंग म्हणाला.
'सचिनचा विक्रम मोडायचाय म्हणून कोहलीनं कॅप्टन्सी सोडली'
धोनीच्या नेतृत्त्वाखालील संघाविरोधात खेळणं नेहमीत आव्हानात्मक असतं असंही तो पुढे म्हणाला. चेन्नईचा संघ तुल्यबळ असून प्रत्येक जण मॅच विनर खेळाडू आहे. त्यामुळे चेन्नई विरुद्धचे सामने नेहमीच रोमांचक ठरतात. चेन्नई आणि मुंबई विरुद्धचा सामना जिंकणं खरंच खूप महत्त्वाचं ठरतं, असं हरभजन म्हणाला.