- हर्षा भोगलेक्रिकेटचा सर्वांत मोठा उत्सव सुरू होत असून प्रत्येक जण यात सहभागी होण्यास इच्छुक आहे. आपल्या या खेळात टी-२० व वन-डे विश्वकप या सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा होत असतात, पण क्रिकेटचा हा सर्वांत लोकप्रिय उत्सव आयपीएलची गोष्टच वेगळी आहे. हे कान्सप्रमाणे आहे. फिल्म फेस्टिव्हल किंवा मोठी मैफिल असेल तर प्रत्येक कवीची उपस्थिती आवश्यक असते. त्यामुळे त्याला सर्वोत्तम कविता ऐकवण्याची व दुसऱ्या कवींची सर्वोत्तम कविता ऐकण्याची संधी मिळत असते.क्रिकेट समजून घेण्यास, समीक्षण करणाºयांसाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. येथे खेळातील सर्व स्टार व उदयोन्मुख स्टार बघायला मिळतात. भविष्यात कुठला स्टार खेळाडू सध्याच्या घडीला सर्वांत आघाडीवर असलेल्या स्टारचे स्थान घेण्यास सक्षम आहे, याचे आकलन करता येते. दिग्गज खेळाडू येथे आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यासाठी सहभागी होत असतात. सिनिअर खेळाडू आपल्यात बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचे सिद्ध करण्यासाठी तर युवा खेळाडू आपली छाप सोडण्यासाठी मैदानात उतरतात. खेळाडू जगभरात आयोजित अनेक लीगमध्ये सहभागी होत असले तरी आयपीएलची बातच वेगळी आहे. येथे आपला ठसा उमटवण्यासाठी प्रत्येक खेळाडू इच्छुक असतो.आयपीएलदरम्यान जगात कुठेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपल्या श्रेष्ठ खेळाडूंना दिग्गजांदरम्यान आपल्या क्षमतेचे आकलन करण्यासाठी पाठविले आहे. जोस बटलर येथून चांगला खेळाडू होऊन परतल्यामुळे बेन स्टोक्स येथे सहभागी होण्यास आलेला आहे. एम.एस. धोनीसोबत खेळण्याची संधी मिळणार असल्यामुळे सॅम बिलिंग्स उत्साहित आहे. दिग्गज खेळाडूंसोबत आपण कसे फिट होणार हे समजून घेण्यास युवा एव्हिन लुईस उत्सुक आहे.येथे नशीब उजळते आणि जीवनही बदलते. २.५ बिलियन डॉलर रकमेच्या प्रसारण अधिकारामुळे आयपीएलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथे कुणालाही जिंकण्याची संधी आहे. सनरायजर्स हैदराबादने २०१६ मध्ये येथे जेतेपद पटकावले होते. स्टार खेळाडूंचा समावेश असलेला आरसीबी संघ गेल्या वर्षी अखेरच्या स्थानी होता.मी प्रत्येक फ्रेन्चायझीच्या सर्वोत्तम एकादशबाबत विचार करीत आहे. एका खेळाडूला दुसºयाच्या स्थानी घेण्याचा विचार करू शकत नाही. या मोसमाच्या निमित्ताने सात भारतीय कर्णधार सात विदेशी प्रशिक्षक आपली रणनीती आखताना दिसतील. धोनीपासून अश्विन आणि कोहली व गंभीर या सर्व कर्णधारांना स्वत:ला सिद्ध करण्याचे कारण आहे. (टीसीएम)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- येथे नशीब उजळते आणि जीवनही बदलते
येथे नशीब उजळते आणि जीवनही बदलते
क्रिकेटचा सर्वांत मोठा उत्सव सुरू होत असून प्रत्येक जण यात सहभागी होण्यास इच्छुक आहे. आपल्या या खेळात टी-२० व वन-डे विश्वकप या सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा होत असतात, पण क्रिकेटचा हा सर्वांत लोकप्रिय उत्सव आयपीएलची गोष्टच वेगळी आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 2:05 AM