विराट कोहलीने इतिहास रचला! सचिन तेंडुलकरचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live :  भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करून सलग चौथ्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 09:38 PM2023-10-19T21:38:36+5:302023-10-19T21:39:02+5:30

whatsapp join usJoin us
Historic: Virat Kohli becomes the fastest ever to complete 26,000 runs in International cricket. | विराट कोहलीने इतिहास रचला! सचिन तेंडुलकरचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

विराट कोहलीने इतिहास रचला! सचिन तेंडुलकरचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live :  भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करून सलग चौथ्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंड पाठोपाठ सलग चार सामने जिंकण्याचा पराक्रम भारताने आज केला. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले २५७ धावांचे लक्ष्य भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करून पार केले. विराट कोहलीने विजयी षटकार खेचून स्वतःचे वैयक्तिक शतकही पूर्ण केले आणि मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.


लिटन दास ( ६६), तनझीद हसन ( ५१), महमुदुल्लाह ( ४६) व मुश्फिकर रहिम ( ३८) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने ८ बाद २५६ धावा केल्या. लिटन दास व तनझीद यांनी ९३ धावांची सलामी दिली होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.


लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८८ धावांची भागीदारी केली. रोहित ४८ धावांवर, तर शुबमन ५३ धावांवर बाद झाला. विराटने ९७ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या. लोकेश राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला, तर श्रेयस अय्यर १९ धावांवर बाद झाला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४८ वे शतक ठरले आणि ८ वर्षानंतर त्याने प्रथमच वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावले. धावांचा पाठलाग करताना हे त्याचे वर्ल्ड कपमधील पहिले शतक ठरले. याचसोबत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २६ हजार धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.
विराट ने ५७७ इनिंग्जमध्ये हा पल्ला पार करून सचिन तेंडुलकरचा ( ६०१ इनिंग्ज) वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.  

 

Web Title: Historic: Virat Kohli becomes the fastest ever to complete 26,000 runs in International cricket.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.