Join us  

‘विराट कोहलीला कसे बाद करायचे?’ इंग्लिश गोलंदाजांसमोर सवाल

Virat Kohli News : ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या शानदार विजयात कोहलीचा सहभाग नव्हता. त्यामुळे तो आता आणखी चांगला खेळ करण्यास उत्सुक असेल. कोहली पितृत्व रजेसाठी भारतात परतला होता. तो आता ५ फेब्रुवारीपासून होणाऱ्या आगामी मालिकेत पुनरागमन करीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 3:36 AM

Open in App

चेन्नई : आगामी कसोटी मालिकेत विराट कोहलीला कसे सामोरे जायचे आणि त्याला बाद कसे करायचे हे मला माहीत नाही, असे इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने म्हटले आहे.त्याच्या मते, ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या शानदार विजयात कोहलीचा सहभाग नव्हता. त्यामुळे तो आता आणखी चांगला खेळ करण्यास उत्सुक असेल. कोहली पितृत्व रजेसाठी भारतात परतला होता. तो आता ५ फेब्रुवारीपासून होणाऱ्या आगामी मालिकेत पुनरागमन करीत आहे. मोईन याने सांगितले की, आम्ही त्याला कसे बाद करणार? तो एक शानदार खेळाडू आहे. चांगला खेळ करण्यास तो नेहमीच उत्सुक असतो. तसेच ऑस्ट्रेलियातील मालिकेनंतर तो चांगली फलंदाजी करण्यास नक्कीच प्रेरित झालेला असणार. मला माहीत नाही की आम्ही त्याला कसे बाद करणार? कारण तो कुठेही कमी पडत नाही. मात्र आमचे गोलंदाजी आक्रमण चांगले आहे. आमच्याकडे चांगले जलदगती गोलंदाज आहेत. मोईनने सांगितले की, तो चांगला माणूस आणि मित्रदेखील आहे. आम्ही क्रिकेटबाबत अधिक चर्चा करीत नाही.’कोविड १९ मधून बरे झाल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या मोईनने सांगितले की, तो आता सामन्यात चांगला खेळ करण्यास सक्षम आहे आणि भारताचे आव्हान स्वीकारण्यास देखील तयार आहे.’ तो म्हणाला की, मला संघात घेतले जाते की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे. मात्र जिथे खेळण्याचा प्रश्न आहे. तेथे मी कायमच तयार आहे. मी खुप वेळ वाट पाहिली. मला वाटते की, मी गडी बाद करू शकतो. धावा करू शकतो आणि संघाला सामना जिंकून देण्यासाठी चांगला खेळदेखील करू शकतो. मी छोटे लक्ष्य ठेवून खेळतो. मी २०० बळी घेण्यापासून फार दूर नाही. ’मोईन श्रीलंका दौऱ्यात कोविड पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याने कसोटीत १८१ बळी घेतले आहेत.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड