भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेत लोकेश राहुलची बॅट चांगलीच तळपली. भारतीय संघानं पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका 5-0 अशी जिंकली. प्रथमच एका संघांनं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या मालिकेतील लोकेशच्या कामगिरीवर जगभरातून कौतुक होत आहे. लोकेशनं या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या मानासह मालिकावीर हा पुरस्कारही पटकावला. पण, त्याच्यावर वेस्ट इंडिजच्या इयान बिशॉप यांनी केलेल्या ट्विटनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.
लोकेश हा सध्याच्या घडीचा सर्वात स्टायलिश फलंदाज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत लोकेश सलामीवीर आणि यष्टिरक्षक या दुहेरी भूमिकेत दिसला. त्यानं या दोन्ही जबाबदाऱ्या चोख पार पाडताना सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे शिखर धवनच्या पुनरागमनाचा मार्ग बिकट बनला आहे. त्यानं पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात 33 चेंडूंत 45 धावांची खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
लोकेशचा मौके पे चौका...भारतीय संघानं प्रथमच पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत अविश्वसनीय कामगिरी केली. भारताच्या विजयात जेवढा वाटा गोलंदाजांचा आहे त्याहून अधिक 'भार' हा लोकेश राहुलनं आपल्या खांद्यावर उचलला. या मालिकेत लोकेश राहुल फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा दुहेरी भूमिकेत होता. या दोन्ही भूमिका त्यानं चोख पार पाडल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये लोकेश अव्वल स्थानी आहे. त्यानं 56 च्या सरासरीनं 2 अर्धशतकांसह 224 धावा चोपल्या. विशेष म्हणजे या मालिकेतून दोनशेहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. टॉप फाईव्हमध्ये लोकेश आणि श्रेयस अय्यर ( 153) वगळता भारताचा तिसरा खेळाडू नाही. यष्टिंमागेही लोकेशनं तीन झेल घेतले आणि एक स्टम्पिंग केले.
Video : सचिन तेंडुलकरचं 'चॅलेंज' विनोद कांबळीनं केलं पूर्ण
पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!
विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान
प्रयोग केला, धडपडलो अन् जिंकलो; दोन 'सुपर' विजयांमधून काय बरं शिकलो?
विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'