Join us  

आयसीसीची घोषणा : टी-20 विश्वकप 17 ऑक्टोबरपासून

यूएई व ओमानमध्ये रंगणार लढती, १४ नोव्हेंबरला अंतिम लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 7:39 AM

Open in App
ठळक मुद्देस्पर्धेच्या पहिल्या फेरीत ८ क्वालिफाईंग संघ सहभागी होतील. ही फेरी ओमान व यूएईमध्ये खेळली जाईल. त्यातील चार संघ सुपर १२ मध्ये पोहचतील. येथे ८ क्वालिफायर असतील.

दुबई : कोरोना महामारीमुळे टी-२० विश्वकप स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत भारताऐवजी यूएई व ओमानमध्ये खेळल्या जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी याची घोषणा केली. यापूर्वी सोमवारी बीसीसीआयने टी-२० विश्वकप स्पर्धा भारताबाहेर खेळल्या जाणार असल्याचे संकेत दिले होते.आगामी स्पर्धा २०१६ नंतर पहिली टी-२० विश्वकप स्पर्धा असेल. यापूर्वी वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करीत जेतेपद पटकावले होते. आयसीसी सीईओ ज्यौफ अलार्डिस म्हणाले, ‘आमचे प्राधान्य आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेचे सुरक्षित आयोजन करण्यास आहे आणि ते सुद्धा सध्याच्या निर्धारित कार्यक्रमानुसार. या निर्णयामुळे आम्ही बायोबबलमध्ये प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद भूषविण्याचा अनुभव असलेल्या देशात स्पर्धेच्या आयोजनाबाबत निश्चिंत आहोत.’

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, ‘भारतात स्पर्धेचे आयोजन करताना आम्हाला आनंद झाला असता, पण सध्याच्या स्थितीत आणि विश्व चॅम्पियनशिपचे महत्त्व बघता बीसीसीआय यूएई व ओमानमध्ये या स्पर्धेचे आयोजन करेल.’ आयसीसीने स्पष्ट केले की, ‘यजमान बीसीसीआयच राहणार असून, सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबूधाबीतील शेख जायेद स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधी खेळले जातील.’

n स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ८ क्वालिफाईंग संघ सहभागी होतील. ही फेरी ओमान व यूएईमध्ये खेळली जाईल. त्यातील चार संघ सुपर १२ मध्ये पोहचतील. येथे ८ क्वालिफायर असतील.n पहिल्या फेरीतील आठ संघात बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान व पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. स्पर्धेची अंतिम लढत १४ नोव्हेंबरला खेळल्या जाईल. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१सौरभ गांगुलीआयसीसी