लंडन : इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 2023च्या वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात केली आहे. 2023 चा वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारतानं स्थान पक्के केले आहे आणि आयसीसी क्रमवारीनुसार भारत सोडून सुपर लीगमधील अव्वल सात संघ थेट पात्र ठरणार आहेत. पण, उर्वरित दोन स्थानांसाठी जवळपास 17 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
आयसीसीनं सोमवारी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 चे वेळापत्रक जाहीर केले. या लीग 2 मध्ये नामिबिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या सात संघांमध्ये 126 वन डे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. या देशांमध्ये एकूण 21 तिरंगी मालिका होणार आहेत. ऑगस्ट 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत प्रत्येक संघाला 36 वन डे सामने खेळणार आहेत.
या लीगमधील पहिली मालिका स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी आणि ओमान यांच्यात 14 ते 21 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या लीगमधील अव्वल तीन संघ 2022 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप पात्रता फेरीसाठी पात्र ठरतील. तर तळातील चार संघ प्ले ऑफ स्पर्धेत खेळतील आणि ते A आणि B चॅलेंज लीगच्या विजेत्या संघांशी भिडतील. प्ले ऑफमधून दोन संघ पात्रता फेरीत प्रवेश करतील आणि त्यानंतर उर्वरीत दोन स्थानांसाठी 10 संघात चुरस होईल.
लीग 2 चे वेळापत्रक14 ऑगस्ट - ओमान वि. पापुआ न्यू गिनी15 ऑगस्ट - स्कॉटलंड वि, ओमान17 ऑगस्ट - स्कॉटलंड वि. पापुआ न्यू गिनी18 ऑगस्ट - स्कॉटलंड वि. ओमान20 ऑगस्ट - स्कॉटलंड वि. पापुआ न्यू गिनी21 ऑगस्ट - ओमान वि. पापुआ न्यू गिनी