Join us  

IND vs BAN Live : विराट कोहलीचे ४८ वे शतक, भारताची विजयी घोडदौड कायम! बांगलादेशला नमवल्यानंतर मिळाली गुड न्यूज 

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घोडदौड चौथ्या सामन्यातही कायम राखली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 9:14 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घोडदौड चौथ्या सामन्यातही कायम राखली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशला झोडून काढले. भारताने ७ विकेट्स राखून आजचा सामना जिंकला. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली व लोकेश राहुल यांनी दमदार फलंदाजी केली. विराटने षटकार खेचून वैयक्तिक शतकही पूर्ण केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तबही केले.

२५,९६०*! विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाढतोय दबदबा, दिग्गज खेळाडूचा मोडला विक्रम 

रोहित शर्मा ( Rohit Sharma)  आणि शुबमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ८८ धावा जोडल्या. रोहितने ४० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. शुबमनने ५५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.  विराट व श्रेयस अय्यर यांनी त्यानंतर संयमी खेळ करताना तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. विराटने ४८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटच्या या २१२ व्या ५०+धावा ठरल्या आणि त्याने जॅक कॅलिसला ( २११) मागे टाकले. सचिन तेंडुलकर ( २६४), रिकी पाँटिंग ( २१७) व कुमार संगकारा ( २१६) हे आघाडीवर आहेत.  

विराटने ५२वी धाव घेताच वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येऊन १००० धावा पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. श्रेयस अय्यरच्या ( १९) वाट्याला आणखी एक अपयशी खेळी आली.  विराटने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आणखी एक विक्रम नावावर केला. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याने रोहितला ( १२४३) मागे टाकले. सचिन ( २२७८), पाँटिंग ( १७४३) आणि संगकारा ( १५३२) हे पुढे आहेत. विराट व रोहित यांनी आजच्याच सामन्यात ब्रायन लारा ( १२२५) व एबी डिव्हिलियर्स ( १२०७) यांना मागे टाकले. विराट व लोकेश राहुल यांनी भारताचा विजय पक्का केला. विराटने विजयासाठी २० धावांची गरज असताना चांगली फटकेबाजी केली. शतकासाठी ९ आणि विजयासाठी ९ असे समीकरण आले असताना लोकेशने त्याला चांगली साथ दिली. विराटने ९७ चेंडूंत वन डे क्रिकेटमधील ४८ वे शतक पूर्ण केले. भारातने ४१,३ षटकांत ३ बाद २६१ धावा करून ७ विकेट्स राखून विजय मिळवला. 

 

तत्पूर्वी, बांगलादेशचे सलामवीर तनझीद हसन ( ५१) व लिटन दास ( ६६) यांनी ९३ धावांची भागीदारी केली. पण, कुलदीप यादवने पहिला धक्का दिल्यानंतर त्यांची गाडी घसरली.  मुश्फिकर रहिम ( ३८) आणि तोवहीद हृदय ( १६) यांनी ४२ धावा जोडल्या. नसूम अहमद ( १४) व महमदुल्लाह २५ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. महमदुल्लाहने  ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा करून बांगलादेशला ८ बाद २५६ धावांपर्यंत पोहोचवले  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीभारत विरुद्ध बांगलादेश