ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा १५०वा सामना आहे. भारताने सर्वाधिक १६७ वन डे सामने श्रीलंकेविरुद्ध खेळले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिज ( १४२), पाकिस्तान ( १३४), न्यूझीलंड ( ११६) आणि इंग्लंड ( १०६) यांचा क्रमांक येतो. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन षटकं सावध खेळ करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने धक्का दिला. मिचेल मार्शचा ( ०) भन्नाट झेल विराट कोहलीने पहिल्या स्लीपमध्ये घेतला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक १५ झेल घेणाऱ्या खेळाडूचा ( यष्टिरक्षक सोडून) विक्रम विराटने नावावर केला. त्याने अनिल कुंबळेचा १४ झेलचा विक्रम मोडला. कपिल देव व सचिन तेंडुलकर हे प्रत्येकी १२ झेलसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
IND vs AUS Live : बूम बूम बुमराह! ऑस्ट्रेलियाला धक्का, विराट कोहलीचा भन्नाट कॅच अन् रेकॉर्ड, Video
डेव्हीड वॉर्नरने चौकार खेचून वर्ल्ड कप स्पर्धेतील १००० धावांचा टप्पा ओलांडला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम वॉर्नरने नावावर नोंदवला. त्याने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला आणि सचिन तेंडुलकर व एबी डिव्हिलियर्स ( २० इनिंग्ज) यांचा विक्रम मोडला. सर व्हीव्ह रिचर्ड्स व सौरव गांगुली यांनी २१ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला होता. मार्क वॉ व हर्षेल गिब्स यांना २२ इनिंग्ज खेळावे लागले होत्या. . ( IND vs AUS Live Scoreboard )
रोहित शर्मा हा वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला. रोहित ३६ वर्ष व १६१ दिवसांचा आहे आणि त्याने मोहम्मद अझरुद्दीनचा १९९९सालचा ( ३४ वर्ष व ७१ दिवस) विक्रम मोडला. एस वेंकटराघवन यांनी १९७९ मध्ये ३४ वर्ष व ५६ दिवसांचे आणि महेंद्रसिंग धोनीने २०१५ मध्ये ३३ वर्ष व २६२ दिवसांचा असताना नेतृत्व केले होते.
Web Title: ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : History: David Warner becomes the fastest to complete 1000 runs in World Cup, Rohit Sharma became a Oldest captain for India in a World Cup match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.