Join us  

पाकिस्तानच्या ओपनर्समुळे ऑस्ट्रेलियाचे दोघे चमकले; चौघांच्या नावावर नोंदवला 'वर्ल्ड' रेकॉर्ड!

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाच्या ३६७ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडूनही जशास तसे उत्तर मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 8:11 PM

Open in App

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाच्या ३६७ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडूनही जशास तसे उत्तर मिळाले आहे. अब्दुल्लाह शफिक आणि इमाम-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला फ्रंटसीटवर बसवले आहे. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर पाकिस्तानकडूनही चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्यांच्या ओपनर्समुळे ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांच्या नावे रेकॉर्ड नोंदवला गेला.  

डेव्हिड वॉर्नर-मिचेल मार्श यांच्याकडून पाकिस्तानची निर्दयी धुलाई! ०९ मोठ्या विक्रमांचा वर्षाव

डेव्हिड वॉर्नर ( १६३) आणि मिचेल मार्श ( १२१) यांच्या विक्रमी फटकेबाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना हतबल केले होते. ही दोघं असेपर्यंत ऑस्ट्रेलिया ४०० पार जाते असे वाटत होते. पण, पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. शाहीन आफ्रिदीने १०-१-५४-५ अशी अप्रतिम स्पेल टाकली.  वॉर्नर व मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी २५९ धावांची भागीदारी केली. ३४व्या षटकात पाकिस्तानला पहिली विकेट मिळाली. मार्श १०८ चेंडूंत १० चौकार व ९ षटकारांसह १२१ धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल ( ०) व स्टीव्ह स्मिथ ( ७) माघारी परतले. हॅरिस रौफने वॉर्नरची विकेट घेतली. वॉर्नर १२४ चेंडूंत १४ चौकार व ९ षटकारांसह १६३ धावांवर बाद झाला. ३२५ धावांवर ऑस्ट्रेलियाची ही चौथी विकेट पडली अन् त्यानंतर त्यांना पुढील ८ षटकांत ४२ धावा करता आल्या. पाकिस्तानने ६ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला ९ बाद ३६७ धावाच करता आल्या. 

प्रत्युत्तरात, पाकिस्तानकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळाले. इमाम-उल-हक आणि अब्दुल्लाह शफिक यांनी साडेसहाच्या रन रेटने धावांचा ओघ सुरू ठेवला होता. १२व्या षटकात पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू शफिकने उत्तुंग उडवलेला होता आणि सीन अबॉट सोपा झेल घेऊ शकला असता. पण, त्याच्या हातून चेंडू निसटला अन् पाकिस्तानला षटकार मिळाला. १८व्या षटकात पॅट कमिन्सने इमामचा सोपा झेल टाकला. इमाम व शफिक यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्यांदा दोन्ही संघांच्या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी २००७ ( ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका) आणि २०११ ( श्रीलंका वि झिम्बाब्वे) असा पराक्रम झालेला. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच ४ ओपनर्सनी ५०+ धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. वन डे क्रिकेटमध्ये यापूर्वी १३ वेळा असा विक्रम झाला होता. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियापाकिस्तान