Join us  

भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक

भारत-कॅनडा यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 9:09 PM

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs CANADA Live Scorecard - भारत-कॅनडा यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले आणि टीम इंडिया ७ गुणांसह सुपर ८ मध्ये पोहोचली. कॅनडाने ४ सामन्यांत ३ गुणांसह स्पर्धेचा निरोप घेतला.

अ गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतर भारतीय संघ आज  कॅनडाविरुद्ध खेळेल. फ्लोरिडा येथे हा सामना होणार आहे आणि इथे काल अमेरिका व आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील पॅक अप निश्चित झाले. आजही भारत-कॅनडा लढतीवर पावसाचे सावट आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीवरील कव्हर्स काढले गेले नव्हते, परंतु पाऊसाने विश्रांती घेतली होती.  ८ वाजता खेळपट्टीची पुन्हा पाहणी केली जाणार असल्याने नाणेफेकीला विलंब झाला. सामनाधिकारी व अम्पायर यांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर नापसंती दर्शवली आणि ९ वाजता पुन्हा पाहणी केली गेली आणि हा सामना रद्द झाल्याची घोषणा झाली. 

भारतीय संघाने आज विजय मिळवल्यास ते ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेच्या सर्वाधिक ३२ विजयांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. सध्या भारतीय संघ ( ३१) दुसऱ्या क्रमांकावर आहे.  पाकिस्तान ( २९),  ऑस्ट्रेलिया ( २८)  व दक्षिण आफ्रिका ( २८) हे टॉप फाईव्ह संघ आहेत.  

सुपर ८ साठी पात्र ठरलेले संघभारतअफगाणिस्तानऑस्ट्रेलियावेस्ट इंडिजदक्षिण आफ्रिकाअमेरिका

टीम इंडियाचे वेळापत्रक२० जून - अफगाणिस्तान वि. भारत, किंग्स्टन ओव्हल - रात्री ८ वाजल्यापासून२० जून - ऑस्ट्रेलिया वि. D2 , सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ स्टँड - पहाटे ६ वाजल्यापासून२२ जून - भारत वि. D2, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ स्टँड - रात्री ८ वाजल्यापासून२२ जून - अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅल ग्राउंड, किंगस्टन - पहाटे ६ वाजल्यापासून २४ जून - ऑस्ट्रेलिया वि. भारत, डॅरेन सॅमी नॅशनल स्टेडियम, सेंट ल्युसिया - रात्री ८ वाजल्यापासून  २४ जून - अफगाणिस्तान वि. D2, अर्नोस व्हॅल ग्राउंड, किंगस्टन - पहाटे ६ वाजल्यापासून   

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतकॅनडा