ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी!

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची वार्ता आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 03:38 PM2019-06-25T15:38:49+5:302019-06-25T15:44:27+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Bhuvneshwar Kumar back in the nets ahead of West Indies Match | ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी!

ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची वार्ता आली आहे. संघाचा प्रमुख गोलंदा भुवनेश्वर कुमार मंगळवारी इंडोअर नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला संघात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं त्याचं सोनंही केलं. शिवाय भुवीची दुखापत लक्षात घेता नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी बीसीसीआयनं नवदीप सैनीला बोलावून घेतले होते. पण, आता भुवीलाच गोलंदाजी करताना पाहिल्यानंतर चाहते त्याच्या पुनरागमनाकडे लक्ष ठेवून आहेत.

भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे माघारी परतला होता. पण त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे भुवनेश्वर कुमारला या सामन्याला मुकावे लागले होते. भुवनेश्वरने दुखापतीपूर्वी २.४ षटके टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते. त्यानंतर भुवी मैदानावर परतला नाही. त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळता आले नव्हते. त्याच्या अनुपस्थितीत शमीनं संघात स्थान पटकावून अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिकची नोंद केली. 




भारताच्या सरावावर पावसाचं पाणी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीवरही सावट?
भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याची सर्वाधिक संधी भारतीय संघालाच आहे. भारतीय संघ गुरुवारी वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. 


या सामन्यात वेस्ट इंडिजकडे गमावण्यासारखे काहीच राहिलेले नाही. त्यामुळे ते त्यांची संपूर्ण ताकद पणाला लावून स्पर्धेचा निरोप घेण्यापूर्वी बलाढ्य संघांना धक्का देण्याचे काम नक्की करू शकतील. पण, भारतीय संघानेही त्यांचा कंबर कसली आहे. पण, मंगळवारी भारताच्या सराव सत्रावर पावसानं पाणी फिरवलं... त्यामुळे प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशीही पाऊस व्यत्यय आणेल का, असा प्रश्न उपस्थित राहत आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध विजय मिळवले, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. 

Web Title: ICC World Cup 2019 : Bhuvneshwar Kumar back in the nets ahead of West Indies Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.