मुंबई : विश्वचषकासाठी बॅक अपचा यष्टिरक्षक म्हणून संघात कुणाची निवड होईल, याकडे तमात क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागले होते. अनेकांच्या मनात प्रश्नही निर्माण झाले होते अखेर अनुभवी दिनेशच्या नावाची घोषणा निवडकर्त्यांनी जाहीर केली. दिनेश कार्तिकची निवड का झाली हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. रिषभ पंत हा संघात निवडल्या गेला असता मात्र दिनेशचा अनुभव त्याच्यापेक्षा वरचढ राहिला, असेही स्पष्ट करण्यात आले. यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक आणि युवा खेळाडू वृषभ पंत यांच्यात चांगलीच चुरस रंगली. या दोघांच्या कामगिरीवर एक नजर...
कार्तिक
९१ एकदिवसीय सामने२०१७ पासून ४२५ धावा, १७ डाव, सरासरी ४७.२२चेस करताना : २०१७ पासून ११ डावांत ३३० धावा, सरासरी ८२.५०वय : ३४स्ट्राईक रेट : ७५.२२ (२०१७ पासून)
रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये शानदार सुरुवात. (९ कसोटीत दोन शतके आणि ४९.७१ सरासरी).स्थानिक टी-२० क्रिकेटमध्ये उत्तम रेकॉर्ड ३३.८० च्या सरासरीने २१९७ धावा. स्ट्राईक रेट १६१.३०प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याची क्षमता. फलंदाजी उत्तम आक्रमकताअनुभव : ५ वन डे आणि १५ टी-२० सामने. परंतु, एकही आर्कषक खेळी नाहीपरिक्वतेची कमतरता, सुरुवातीला विकेट फेकण्याची सवय.