लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. पण या विश्वविजयाचा जल्लोष इंग्लंडच्या संघाने केला तरी कसा, ते पाहा खास व्हिडीओमध्ये
हा पाहा खास व्हिडीओ
बेन स्टोक्स ठरला इंग्लंडच्या विश्वविजयाचा शिल्पकार, सचिननेही केले कौतुक
इंग्लंडच्या विश्वविजयाचा शिल्पकार ठरला तो अष्टपैलू बेन स्टोक्स. कारण स्टोक्सने अखेरपर्यंत किल्ला लढवत ८४ धावांची अतुलनीय खेळी साकारली. त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्येही त्याने दमदार फलंदाजी केली. त्यामुळेच स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्टोक्सला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला आणि त्याचे कौतुकही केले.
'हाच' तो इंग्लंडचा विश्वविजयाचा क्षण
इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातली. न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम फेरीचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत इंग्लंडने विश्वचषक जिंकला. पण नेमक्या इंग्लंडने कोणत्या क्षणी विश्वचषक जिंकला ते पाहा....
इंग्लंडचे 'बॅट'लक; विश्वविजयासाठी ठरले निर्णायक
इंग्लंडने अखेर विश्वचषकाला गवसणी घातली. पण इंग्लंडच्या या विश्वविजयात एका बॅटची निर्णायक भूमिका ठरली. अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बेन स्टोक्सने दोन धावा घेतल्या. पण या दोन धावा घेत असताना इंग्लंडला एकूण सहा धावा मिळाल्या आणि त्या फक्त एका बॅटमुळे मिळाल्या.
स्टोक्स फटका मारून दुसरी धाव घेण्यासाठी धावत सुटला. त्यावेळी त्याच्या दिशेने चेंडू फेकला गेला. त्यावेळी चेंडू स्टम्पच्या दिशेने जात असताना स्टोक्सची बॅट त्या बॉलला लागली आणि चौकार गेला. स्टोक्स हा प्रकार जाणीवपूर्वक केल्या नसल्यामुळे हा चौकार देण्यात आला.
Web Title: ICC World Cup 2019: How England Enthusiast, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.