- ग्रॅमी स्मिथ लिहितात...
इंग्लंडने या विश्वचषकात स्वत: स्वत:च्या अडचणी निर्माण केल्या. न्यूझीलंडला हरवून मात्र उपांत्य फेरी गाठण्याची आता त्यांना संधी आहे. त्यासाठी मोक्याच्या क्षणी चुका करणारा आमचा संघ नाही, हे त्यांना सिद्ध करावे लागेल. माझ्या मते त्यांच्या मतानुसार सामना पुढे जात नसेल तर इंग्लंड संघ लवकर गुडघे टेकतो. इंग्लंड संघ आघाडीच्या तीन फलंदाजांवर अधिकच विसंबून आहे. हे तिघे अन्य फलंदाजांना मोकळेपणे खेळण्याची संधी निर्माण करुन देतात. पण आघाडीचे तिन्ही फलंदाज अपयशी ठरले तर मात्र इंग्लंडकडे प्लॅन ब तयार नसतोच.
या उलट न्यूझीलंडला इंग्लंडवर वर्चस्व गाजवायचे झाल्यास काही मुद्दे ध्यानात घ्यावे लागतील.
विशेषत: संघ निवड जपून करावी. मंद खेळपट्टीवर न्यूझीलंडने ईश सोढीचा अधिकाधिक वापर करावा, असे सुरुवातीपासून सांगत आहे. चेस्टर ली स्ट्रीटची खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे. अशावेळी संघाने या पर्यायावर विचार करायलाच हवा. याशिवाय मॅट हेन्री ऐवजी मी संघात टीम साऊदी याला पाहू इच्छितो.
ब्रँडन मॅक्युलम याने देखील अनुभवाच्या आधारे टीम साऊदी याला संघात स्थान मिळायला हवे असे टिष्ट्वट केले. अनुभवाच्या आधारे मॅक्युलमच्या सूचनेकडे डोळेझाक करता येणार नाही. साऊदी मोठ्या सामन्यातील अनुभवी खेळाडू असून नेतृत्वगुण असल्यासारखा खेळतो. इंग्लंडविरुद्ध डावपेचांची अंमलबजावणी करण्यासाठी केन विलियम्सन याला अन्य सहकाऱ्यांची गरज भासणारच आहे. न्यूझीलंडला मार्टिन गुप्तिल याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. त्याने लंकेविरुद्ध नाबाद ७३ धावा ठोकल्या होत्या. पण त्याच्यासारख्या खेळाडूकडून हे योगदान पुरेसे ठरत नाही. त्याच्या फलंदाजीची सरासरी ४० च्या वर आहे.
अशावेळी केन विल्यम्सनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. त्याला मोठी खेळी करावी लागेल.रॉस टेलर आणि गुप्तिल यांनी समजून घ्यावे की संघाच्या हितासाठी मोठी जबाबदारी स्वीकारावीच लागेल. केन विलियम्सन शानदार खेळत असताना त्याच्याकडूनही प्रेरणा घेण्यास हरकत नाही.
Web Title: ICC World Cup 2019: New Zealand should consider playing Saawide
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.