Join us  

ICC World Cup 2019 : विजय शंकर ठरू शकतो विराटसेनेसाठी हुकमी एक्का... जाणून घ्या का?

ICC World Cup 2019 : रिषभ पंत आणि अंबाती रायुडू हे कट्टर प्रतिस्पर्धी शर्यतीत असताना दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांनी भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 4:51 PM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रिषभ पंत आणि अंबाती रायुडू हे कट्टर प्रतिस्पर्धी शर्यतीत असताना दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांनी भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले. यामध्ये शंकरचे नाव सर्वांना बुचकळ्यात टाकणारे आहे. 9 वन डे आणि 9 ट्वेंटी-20 सामने एवढाच काय तो शंकरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव. पण, तरीही त्याने मौके पे चौका मारताना वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान पटकावले. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी त्यांनी शंकरला का निवडले हेही सांगितले. ते म्हणाले,'' चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही मधल्या फळीसाठी अनेक पर्याय वापरून पाहिले. त्यात दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांचा समावेश होता. त्याशिवाय आम्ही अंबाती रायुडूलाही अनेक संधी दिल्या, परंतु विजय शंकरचा आम्ही अष्टपैलू म्हणून वापर करू शकतो. तो फलंदाजी व गोलंदाजीही करू शकतो, तसेच तो उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. चौथ्या स्थानासाठी शंकरचा आम्ही विचार करत आहोत.''  

अशी असेल संघाची क्रमवारीसलामी- रोहित शर्मा व शिखर धवनमधली फळी -  विराट कोहली, विजय शंकर/ लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी6-7 क्रमांक - हार्दिक पांड्या, केदार जाधव/ रवींद्र जडेजा/ दिनेश कार्तिकफिरकी गोलंदाज - युजवेंद्र चहल/ कुलदीप यादवजलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९विराट कोहलीबीसीसीआयमहेंद्रसिंग धोनीलोकेश राहुलशिखर धवनरोहित शर्मादिनेश कार्तिकजसप्रित बुमराहमोहम्मद शामीहार्दिक पांड्यारवींद्र जडेजाकेदार जाधव