WTC Final: भन्नाट कॅच! बॅट लागताच वेगाने आला चेंडू, गिलने टिपला अफलातून झेल (Video)

Shubman Gill catch, WTC Final 2023 IND vs AUS: बॅटला लागून चेंडू अतिशय विचित्र उंचीवर वेगाने शुबमन गिलच्या दिशेने येत होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 04:40 PM2023-06-08T16:40:52+5:302023-06-08T16:41:21+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Shubman Gill takes superb catch to dismiss Cameron green on Shami bowling watch video | WTC Final: भन्नाट कॅच! बॅट लागताच वेगाने आला चेंडू, गिलने टिपला अफलातून झेल (Video)

WTC Final: भन्नाट कॅच! बॅट लागताच वेगाने आला चेंडू, गिलने टिपला अफलातून झेल (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill catch, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: कसोटी विश्वविजेतेपदाच्या फायनल सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी केली. पहिल्याच दिवशी त्यांनी त्रिशतकी मजल मारत सामन्यावर दावा सांगितला. पण दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगले पुनरागन केले. ट्रेव्हिस हेडचे दीडशतक आणि स्टीव्ह स्मिथचे शतक झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कमबॅक केला. त्यातही शुबमन गिलने टिपलेला कॅच नक्कीच खास ठरला.

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातही भारतीय गोलंदाजांना सुरूवातीच्या काही षटकांत मार खावा लागला. स्टीव्ह स्मिथने आपले ३१वे कसोटी शतक ठोकले. तर ट्रेव्हिस हेडने देखील आपले दीडशतक पूर्ण केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने बाऊन्सरचा मारा करत अखेर हेडला १६३ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी हल्लोबोल केला. नव्याने आलेल्या कॅमेरॉन ग्रीनवर भारतीय खेळाडूंनी दडपण आणले. त्यामुळे बाहेरचा चेंडू खेळण्यास तो प्रवृत्त झाला आणि त्यातच मोहम्मद शमीच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. चेंडू त्याच्या बॅटला लागून वेगाने स्लिपमध्ये गेला. चेंडू अतिशय विचित्र उंचीवर वेगाने शुबमन गिलच्या दिशेने येत होता, पण त्याने चपळाइने स्वत:ला अडजस्ट करत उत्तम असा झेल टिपला आणि ग्रीनला अवघ्या ६ धावांत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

--

--

त्याआधी, कालच्या दिवशी रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. सिराजने सलामीवीर उस्मान ख्वाजाला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चिवट खेळ केला. तो ६० चेंडूत ८ चौकारांसह ४३ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ लाबूशेनही २६ धावांवर मोहम्मद शमीकरवी त्रिफळाचीत झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ३ बाद ७६ या धावसंख्येवर होती. पण त्यानंतर बाजी पलटली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद २५१ धावांची भागीदारी केली होती. अखेर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात २८५ धावांची भागीदारी झाल्यानंतर, सिराजने हेडला माघारी धाडले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथदेखील शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर १२१ धावांवर त्रिफळाचीत झाला.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Shubman Gill takes superb catch to dismiss Cameron green on Shami bowling watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.