Ajinkya Rahane Lucky, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 2: ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय संघाने खराब सुरूवात केली. ट्रेव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने साडेचारशे पार मजल मारली. त्यानंतर भारताचे रोहित, गिल, पुजारा, कोहली हे पहिले चार गडी ७० धावांतच माघारी गेले. अजिंक्य रहाणेही त्याच यादीत जाणार होता, पण त्याच्या नशिबाने त्याला तारले. नक्की काय घडलं, जाणून घ्या.
४६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी घोर निराशा केली. या दोघांनी सुरूवातीपासूनच धावा जमवायचा चंग बांधला आणि गणित फसलं. कर्णधार रोहित १५ धावांवर, तर शुबमन गिल १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा आणि कोहली दोघेही प्रत्येकी १४-१४ धावा काढून माघारी परतले. अजिंक्य रहाणे क्रीजवर असताना, एक विचित्र घटना घडली. पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणेला चांगलंच सतवलं. त्याने हाफ पिच चेंडू टाकून रहाणेला LBW केले. पंचांनीही त्याला बाद ठरवले पण रहाणेला ते मान्य नव्हते. त्यामुळे त्याने DRS घेतली. साऱ्यांची नजर चेंडूची लाइन आणि उंची यावर होती, त्याच वेळी वेगळीच घटना घडली. DRSच्या प्रक्रियेआधी पॅट कमिन्सचा पाय लाइनच्या पुढे असल्याने तो नो बॉल ठरवण्यात आला. त्यामुळे DRSची पुढील प्रक्रिया करावीच लागली नाही आणि रहाणेला जीवनदान मिळाले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, त्याआधी रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. दोघे स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाने दोघांना बरोबर अडकवले. कर्णधार रोहित हाफ पिच चेंडूवर २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल चेंडू सोडून देताना, स्विंगने त्याला वेडं बनवलं. स्कॉट बोलंडचा बाहेरचा चेंडू सोडताना चेंडू आत आला आणि त्याचा स्टंप उडवला. अगदी तसाच पुजारादेखील बाद झाला. पुजारा शांत व संयमीपणे खेळत होता. पण २५ चेंडूंवर १४ धावांवर खेळताना त्याने चेंडू सोडला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कच्या बाऊन्सर चेंडूवर विराट कोहली १४ धावांवर झेलबाद झाला. रहाणे आणि जाडेजा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली होती, पण जाडेजा ४८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे १५०च्या आतच भारताने निम्मा संघ गमावला.