ICC World Test Championship : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाचा सामना 18 जूनपासून सुरू होत आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयसीसीनं अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्यामुळे पहिल्यावहिल्या WTCचे जेतेपद कोण पटकावतो याची उत्सुकता लागली आहे. आयसीसीनं जून 2019मध्ये ही स्पर्धा सुरू केली आणि कसोटी खेळणाऱ्या 9 देशांमध्ये अंतिम फेरीसाठीची शर्यत रंगली.
भारतीय संघानं केली आयसीसीकडे न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; मैदानाबाहेर सुरू झाला वेगळाच सामना
भारत आणि न्यूझीलंड या संघांनी WTC फायनलसाठीच्या शर्यतीत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान पटकावले. कोरोना व्हायरसमुळे काही सामने रद्द करावे लागल्यानं आयसीसीनं स्पर्धेच्या मध्यंतरानंतर नियमांतही किंचीत बदल केले. त्यामुळे जय-पराजयाच्या सरासरीवरून अंतिम फेरीतील दोन संघ निवडले गेले. भारतानं 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आयसीसीच्या स्पर्धेत विजय मिळवला होता, तर किवींनी 2000ची चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी उंचावण्यासाठी आतुर आहेत.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'त्या' कृतीमुळे शेअर बाजार गडगडला, Coca Colaला USD 4 billion चा फटका बसला!
न्यूझीलंडनं WTC फायनलपूर्वी यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली अन् त्यात 1-0 असा विजयही मिळवला. त्यामुळे त्यांचे मनोबल नक्कीच उंचावले असेल.
- केव्हा व कुठे आहे WTC Final? - 18 ते 22 जून या कालावधीत साऊदॅम्प्टन येथील रोस बाऊल स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
- सामन्याची वेळ - भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होईल
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी येथे सामना पाहता येईल. हॉटस्टार वरही ही लढत पाहता येईल
- समालोचक कोण?
- इंग्रजी - नासीर हुसैन, माईक आथेर्टन, इयान बिशॉप, कुमार संगकारा, दिनेश कार्तिक, सायमन डॉल, इसा गुहा, सुनील गावस्कर, क्रेग मॅकमिलन
- हिंदी - आकाश चोप्रा, संजय बांगर, व्ही व्ही एस लक्ष्मण, इरफान पठाण, जतीन सप्रू.
- न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग
- भारताचा संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्घीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज