कोलकाता : भारतातील अनेक क्रिकेटपटू आमच्या देशातील महत्त्वाकांक्षी ‘द हंड्रेड’(एका डावात १०० चेंडूंचा क्रिकेट सामना) आणि जगातील अन्य फ्रँचायझी आधारित क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास उत्सुक आहेत, असा दावा इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार इयोन मॉर्गनने केला आहे. अव्वल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऐवजी आकर्षक खासगी लीगमध्ये कारकीर्द घडविण्यासाठी बाध्य व्हावे लागू नये यासाठी आगामी १० वर्षांसाठी एक योजना निश्चित करण्याची विनंती इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या मॉर्गनने क्रिकेटचे संचालन करणाऱ्यांना केली आहे. ‘द हंड्रेड’ स्पर्धेला गेल्या वर्षी सुरुवात झाली, पण कोरोना व्हायरस महामारीमुळे वर्षभरासाठी स्थगित करण्यात आली.
Web Title: Identifies those who want to play in 'The Hundred' - Morgan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.