इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येतील. त्यानंतर IPL 2022मध्ये बीसीसीआय दोन नवीन संघांचा समावेश करणार आहे आणि त्यासाठी मेगा ऑक्शन होणार आहे. प्रत्येक फ्रँचायझींना फक्त ४ खेळाडूंनाच रिटेन ( संघात कायम राखणे) करता येणार आहे. त्यामुळे आतापासूनच संघ रणनिती आखायला लागले आहेत. त्यात ४० वर्षांचा महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा आयपीएलच्या पुढील पर्वात चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) खेळणार की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. धोनीचा खास मित्र सुरेश रैना ( Suresh Raina) यानं दरम्यान मोठी घोषणा केली आहे. ( Suresh Raina Makes Huge Statement, Says he Will Not Play IPL if CSK Skipper MS Dhoni Doesn’t Play)
जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video
३४ वर्षीय सुरेश रैना आणखी ४-५ वर्ष आयपीएल सहज खेळू शकतो, परंतु जर महेंद्रसिंग धोनीनं आयपीएलमधून निवृत्ती घेतली, तर आपणही निवृत्ती घेऊ, असे विधान रैनानं केलं आहे. ( Suresh Raina said he has another four-five years of cricket left in him but that he will retire if MS Dhoni decides to retire from the IPL). विशेष बाब म्हणजे १५ ऑगस्ट २०२० ला महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले अन् लगेचच तासाभरात सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळीची या दोघांच्या मैत्रीचे दाखले दिले गेले.
''मी अजूनही ४-५ वर्ष क्रिकेट खेळू शकतो. यावर्षी आयपीएल खेळायचे आणि त्यानंतर पुढील पर्वात दोन नवीन संघ दाखल होणार आहेत. मी जोपर्यंत आयपीएल खेळतोय, तोपर्यंत CSKकडूनच खेळत राहणार. आशा करतो की यावर्षी आम्ही चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होऊ,''असे रैनानं News 24 Sports शी बोलताना सांगितले. तो पुढे म्हणाला,''धोनी भाई पुढील पर्व खेळणार नसेल, तर मीही खेळणार नाही. आम्ही २००८ पासून CSKसाठी खेळत आहोत. यावर्षी आम्ही चषक उंचावण्यात यशस्वी ठरलो, तर मी माहीला पुढील वर्षी खेळण्यासाठी राजी करेन. मी माझ्याकडून प्रयत्न करेन. जर तो खेळणार नसेल, तर मला वाटत नाही की मीही आयपीएलमध्ये दुसऱ्या कुठल्या संघाकडून खेळीन. ''
पाहा व्हिडीओ...