19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने आतापर्यंत सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारताने यापूर्वी आतापर्यंत सहावेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सहापैकी चारवेळा भारतावे विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीतील भारताची कामगिरी सरस असून हा विश्वचषक भारत जिंकणार का, हे येत्या काही दिवसांमध्ये समजू शकते.
19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. यशस्वी जैस्वालने षटकार लगावत आपले शतक पूर्ण करत भारताच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. यशस्वीने आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद १०५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली, दिव्यांश सक्सेनाने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ५९ धावा करून यशस्वीला सुयोग्य साथ दिली.
भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव १७२ धावांमध्ये आटोपला होता. या आव्हानाचा भारताना सुरेखपणे पाठलाग केला. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी दमदार फलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली युवा विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर २००६ आणि २०१६ मध्ये भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्यांना जेतेपद पटकावता आले नव्हते.