भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक समजला जातो. त्याचबरोबर तो कधीही आपल्या चुका मान्य करत नाही. पण कोहलीने मात्र आपली चुक मान्य केली आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने मी चुकलो, पण त्या चुकीचे मला शल्य वाटत नाही, असे कोहली म्हणाला आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक आहे. पण त्याचा हा आक्रमकपणा त्याच्या कर्णधारपदाला साजेसा नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत.
लँगर म्हणाले की, " मैदानामध्ये कोहली जे सेलिब्रेशन करतो, ते पाहून चांगले वाटले. पण जर हीच गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ही गोष्ट केली असती तर त्यांच्यावर टीका झाली असती. कोहली हा सुपरस्टार आहे. त्याचबरोबर तो भारताचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर दडपण बनवत असतो. त्यामुळे कदाचित कोहलीकडून असे होत असावे. कोहलीचा हा आक्रमकपणा त्याच्या कर्णधारपदाला साजेसा नाही."
पण कोहलीने आपली चुक जी मान्य केली आहे, त्याचा लँगर यांच्या बोलण्याचा काहीही संबंध नाही. कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यामध्ये जे काही केले त्याबद्दल आपली चूक मान्य केली आहे.
याबाबत कोहली म्हणाला की, " मी जे काही गेल्या दौऱ्यात केले, ते फारसे चांगले नव्हते. कारण त्या दौऱ्यात मी सीमारेषा ओलांडली होती. पण या गोष्टीमधून मी बरेच काही शिकलो आहे. मी माझी चुक मान्य करत असलो तरी त्याचे मला काहीही वाईट वाटत नाही. "