Join us  

IND vs AUS 3rd T20 : ... आणि ट्रोल झाला रिषभ पंत, चाहत्यांनी ट्विटरवर चांगलेच सुनावले

तिसऱ्या सामन्यातही जेव्हा भारतीय संघाला रिषभची गरज होती. तेव्हा पहिल्याच चेंडूवर रिषभ चुकीचा फटका मारताना बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 5:41 PM

Open in App
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनीला भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून बाहेर काढून रिषभला स्थान देण्यात आले.आतापर्यंत रिषभकडून फारशी चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही.रिषभला संघात ठेवायचे की नाही, याचा विचार निवड समितीला करावा लागेल.

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने सोशल मीडियावर पृथ्वी शॉबरोबरचा एक फोटो टाकला आणि तो चांगलाच ट्रोल झाला. ट्विटरवर तर रिषभला चाहत्यांनी चांगलेच सुनावले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत रिषभला भारताला विजय मिळवून देण्याची संधी होती. पण रिषभने मोक्याच्या क्षणी आपली विकेट बहाल केली. त्यामुळेच चाहत्यांनी रिषभला धारेवर धरले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात रिषभ आणि दिनेश कार्तिक यांनी दमदार फटकेबाजी केली होती. त्यांच्या या फलंदाजीच्या जोरावर भारत विजयाचे स्वप्न पाहत होता. पण रिषभने चुकीचा फटका लगावला आणि त्यानंतर भारताचा पराभव झाला. तिसऱ्या सामन्यातही जेव्हा भारतीय संघाला रिषभची गरज होती. तेव्हा पहिल्याच चेंडूवर रिषभ चुकीचा फटका मारताना बाद झाला. पुन्हा एकदा त्याने आपली विकेट आंदण दिली. 

महेंद्रसिंग धोनीला भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून बाहेर काढून रिषभला स्थान देण्यात आले. पण आतापर्यंत रिषभकडून फारशी चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे धोनीचे चाहते आता निवड समितीला प्रश्न विचारू लागले आहेत. त्यामुळे रिषभला संघात ठेवायचे की नाही, याचा विचार निवड समितीला करावा लागेल.

 

 

 

 

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया