सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत अशी एक गोष्ट घडली की, नजर हटी, दुर्घटना घटी हे वाक्य पटकन डोळ्यापुढे आले. ही गोष्ट घडली ती भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या बाबतीत.
कृणाल पंड्याच्या आठव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ही गोष्ट घडली. पंड्याच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच मोठा फटका मारायला सरसावला. त्यावेळी फिंचचा फटका चुकला. फिंचने टोलावलेला चेंडू उंच उडाला. यावेळी रोहित हा झेल पकडण्यासाठी धावत आला. रोहित बरोबर चेंडूच्या खाली आला. आता रोहित झेल पकडणार असे वाटत होते. पण रोहितने बॉलवरची नजर हटवली आणि चेंडू त्याच्या हातातून निसटला. रोहितने झेल सोडला तेव्हा फिंच 22 धावांवर होता. पण यानंतर फिंचला मोठी खेळी साकारता आली नाही. फिंचला 28 धावांवर असताना कुलदीप यादवने बाद केले.