IND vs AUS T20 2022 Live Match - कॅमेरून ग्रीनचा ( Cameron Green) तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल ( Axar Patel) व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell) विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. पण, अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने ( Tim David) भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले...
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. रिषभ पंत याच्याजागी आज रोहितने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुन्हा संघात इन केले. कॅमेरून ग्रीनने वादळी खेळी करून भारतीय गोलंदाजांना पळता भुई करून सोडले होते. ऑसी आज धावांचा डोंगर उभा करतील असे वाटत असताना अक्षर पटेल गेम चेंजर ठरला. ग्रीनने १९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. भुवनेश्वर कुमारने पाचव्या षटकात ग्रीनची विकेट मिळवली. ऑसी फलंदाज २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा करताना लोकेश राहुलच्या हाती झेलबाद झाला.
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अक्षरने ७व्या षटकात पॉइंटला स्टीव्ह स्मिथचा झेल टाकला. स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल ही नवी जोडी खेळपट्टीवर असल्याने भारतीय गोलंदाजांना दडपण निर्माण करण्याची संधी मिळाली. युजवेंद्र चहलच्या ८व्या षटकात मॅक्सवेलने चेंडू चांगला टोलवला, परंतु सीमारेषेवर अक्षरने तो अडवला आणि डायरेक्ट हिट करून मॅक्सवेलला रन आऊट करून माघारी जाण्यास भाग पाडले. पण, त्यातही ट्विस्ट पाहायला मिळाले. चेंडू बेल्सवर आदळण्यापूर्वी एक बेल्स दिनेश कार्तिकच्या ग्लोव्ह्जला लागून आधीच खाली पडली होती. मॅक्सवेलला ( ६) माघारी जावे लागले.
यानंतर युजवेंद्र चहलने स्मिथला ( ९) स्टम्पिंग केले. ऑसींनी १० षटकांत ४ बाद ८६ धावा केल्या. जोश इंग्लिस व टीम डेव्हिड ही जोडी सेट होऊ पाहत होती अन् रोहितने पुन्हा अक्षरला बोलावले. इंग्लिस २२ चेंडूंत २४ धावांवर रोहितच्या हाती झेल देऊन माघारी परतला अन् ऑसींचा ११५ धावांवर निम्मा संघ माघारी परतला. त्याच षटकात अक्षरने पाचव्या चेंडूवर मॅथ्यू वेडचा सुरेख रिटर्न कॅच टिपला अन् सामना भारताच्या बाजूने झुकवला. अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेत, पुन्हा एकदा आपले नाणे खणखणीत वाजवले. ( Axar finishes his spell with 4-0-33-3) युजवेंद्रनेही २२ धावांत १ विकेट घेत ऑसींवर दडपण निर्माण केले.
मुंबई इंडियन्समुळे चर्चेत आलेल्या टीम डेव्हिडने भुवीच्या १८व्या षटकात २१ धावा कुटल्या. डॅनिएल सॅम्सनेही हात साफ केले. डेव्हिड व सॅम्स यांनी २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. डेव्हिडने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचून २५ चेंडूंत पहिले अर्धशतक झळकावले. तो २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाने ७ बाद १८६ धावा केल्या.
Web Title: ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : India needs 187 runs to win the T20 series against Australia.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.