IND vs AUS T20 2022 Live Match - ऑस्ट्रेलियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व लोकेश राहुल झटपट माघारी परतले. पण, विराट कोहली व सूर्यकुमार यादव ( surayakumar yadav) यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. सूर्यकुमार २०२२या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ४२ षटकारांच्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या विक्रमाशी बरोबरी केली.
२४ तासांत भारताकडून दुसरा वादग्रस्त रन आऊट, कार्तिकच्या ग्लोव्ह्जला लागून बेल्स उडाली अन् वाद झाला
कॅमेरून ग्रीनचा ( Cameron Green) तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल ( Axar Patel) व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell) विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने ( Tim David) भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले आणि तगडे आव्हान उभे केले.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. रिषभ पंत याच्याजागी आज रोहितने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुन्हा संघात इन केले. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. कर्णधार अॅरोन फिंचनंतर ( ७ ) ऑस्ट्रेलियाची मधली फळी ढेपाळली. स्टीव्ह स्मिथ ( ९) व ग्लेन मॅक्सवेल ( ६) हे झटपट माघारी परतले. युजवेंद्र चहलच्या ८व्या षटकात मॅक्सवेलने चेंडू चांगला टोलवला, परंतु सीमारेषेवर अक्षरने तो अडवला आणि डायरेक्ट हिट करून मॅक्सवेलला रन आऊट करून माघारी जाण्यास भाग पाडले. पण, त्यातही ट्विस्ट पाहायला मिळाले. चेंडू बेल्सवर आदळण्यापूर्वी एक बेल्स दिनेश कार्तिकच्या ग्लोव्ह्जला लागून आधीच खाली पडली होती.
अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ विकेट घेत ऑसींवर दडपण निर्माण केले. पण, डॅनिएल सॅम्स व टीम डेव्हिड या जोडीने ३४ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली. मुंबई इंडियन्समुळे चर्चेत आलेल्या टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला. भुवीने ३ षटकांत ३९ ( १ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या.
प्रत्युत्तरात लोकेश राहुल ( १) पहिल्याच षटकात झेलबाद झाला. यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने उत्तुंग उडालेला चेंडू अप्रतिमरित्या टिपला. रोहित शर्माने पुन्हा खणखणीत षटकार मारून मागच्या सामन्यातील अफलातून खेळीची झलक दाखवली. पण, पॅट कमिन्सने त्याला १७ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. सूर्यकुमार यादव व विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरताना सुरेख फटकेबाजी केली.