Join us  

IND vs AUS : भारत आर्मीला दिली जडेजा आणि भुवनेश्वरने भेट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 12:56 PM

Open in App
ठळक मुद्देआता भारताचीही अशीच एक चाहत्यांची आर्मी तयार झाली आहे. भारत आर्मी, असे तिचे नाव.भारत आर्मी अॅडलेडला येऊन धडकली आहे.

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः प्रत्येक संघाचे चाहते असतात. सामाना सुरु असताना हे चाहते खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. इंग्लंडची बार्मी-आर्मी ही इंग्लंडची चाहत्यांची टीम प्रत्येक ठिकाणी जाऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत असते. आता भारताचीही अशीच एक आर्मी तयार झाली आहे. भारत आर्मी, असे तिचे नाव. भारत आर्मी अॅडलेडला येऊन धडकली आहे. या आर्मीला संघातील रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी भेट दिली.भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता.

अॅडलेड कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना पर्थ येथे 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येईल. तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे मेलबर्न व सिडनी येथे 26 डिसेंबर आणि 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. हे सामने अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे जानेवारी महिन्यात होतील. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला धक्का बसला आहे. सराव सामन्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दुखापत झाली असून तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभुवनेश्वर कुमाररवींद्र जडेजा