India vs England Test Match Live : रिषभ पंत ( Rishabh Pant) हे वेगळंच समीकरण आहे. जेम्स अँडरसनसारख्या अनुभवी गोलंदाजाला रिव्हर्स फटका मारण्याचे धाडस रिषभच करू शकतो. स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स यांना तर त्याने सहज चोपले. फिरकीपटू जॅक लिच याला रिषभने बळीचा बकरा बनवले... ५ बाद ९८ अशा अवस्थेत सापडलेल्या टीम इंडियाला रिषभने संजीवनी दिली. आक्रमणाला आक्रमणानेच उत्तर देण्याच्या त्याच्या खेळीने भारताने जरबदस्त कमबॅक केले. अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) त्याच्या सोबत खंबीरणे उभा राहिला.
शुबमन गिल ( १७), चेतेश्वर पुजारा ( १३), हनुमा विहारी ( २०), विराट कोहली ( ११ ) व श्रेयस अय्यर ( १५) हे झटपट माघारी गेल्यामुळे भारताची अवस्था ५ बाद ९८ अशी झाली होती. जेम्स अँडरसनने यापैकी तीन, तर पॉट्सने दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर
रिषभ पंत व
रवींद्र जडेजा ही डावखुरी जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून उभी राहिली. रिषभने आजच्या सामन्यात सर्वात कमी वयात १०० षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजासह, सर्वात जलद २०००+ कसोटी धावा करणाऱ्या यष्टिरक्षकाचा विक्रम नावावर केला. १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये पाहुण्या संघातील यष्टीरक्षकाने दोन शतक आतापर्यंत कधीच झळकावली नव्हती. पण, रिषभच्या आजच्या शतकाने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. रिषभने ८९ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केले. पाठोपठ जडेजानेही ११० चेंडूंत अर्धशतक झळकावले.
रिषभने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथे चार कसोटी शतकं झळकावली आहेत. एडबस्टन येथे कसोटी शतक झळकावणारा रिषभ हा सचिन तेंडुलकर ( १२२) व विराट कोहली ( १४९) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरला. रिषभने १४६ धावा करून तेंडुलकरचा एडबस्टनवरील विक्रम मोडला. रिषभ व जडेजा यांनी द्विशतकी भागीदारी पूर्ण करून आणखी एक विक्रम नोंदवला. इंग्लंडमध्ये पाच किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील ही भारताकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१८मध्ये रिषभ व लोकेश राहुल यांनी ओव्हल कसोटीत २०४ धावांची भागीदारी केली होती. सुनील गावस्कर व चेतन चौहान यांनी १९७९साली एडबस्टन येथे १२४ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर रिषभ-जडेजाने येथे शतकी भागीदारी केली. जो रूटने ही विकेट मिळवून दिली.
रिषभ पंत १११ चेंडूंत १९ चौकार व ४ षटकारांसह १४६ धावांवर बाद झाला... रवींद्र जडेजासह त्याने २३९ चेंडूंत २२२ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्याने केवळ चौकार- षटकारांनी २३ चेंडूंत १०० धावा चोपल्या.
Web Title: IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : Rishabh Pant 111-ball 146 has helped revive from 98/5 as they are scorching at 320/6, break Sachin Tendulkar record, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.