India ODI squad for England series भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी BCCI नं केली. सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश करण्यात आला असून टी नटराजन, भुवनेश्वर कुमार वन डे संघात पुनरागमन करणार आहेत. २३, २६ व २८ मार्चला पुण्यात हे वन डे सामने होणार आहेत. इंग्लंडच्या पराभवामागे रोहित शर्माचं डोकं; शार्दूल ठाकूरला दिला मंत्र अन् टीम इंडियाची बाजी
मागील दोन वन डे मालिकेत टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यांना सहा पैकी ५ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. पुण्यात भारतीय संघानं चार वन डे सामने खेळले आणि त्यापैकी दोन सामने जिंकले. २०१७मध्ये पुण्यात इंग्लंडविरुद्ध एकमेव वन डे सामना झाला होता आणि त्यात भारतानं तीन विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराट कोहली व केदार जाधव यांनी शतक झळकावलं होतं. जानेवारी २०२०मध्ये पुण्यात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता.
ऑगस्ट २०१९पासून विराटनं एकही शतक झळकावलं नाही. १४ महिन्यांपासून वन डे सामना न खेळलेला रिषभ पंत पुनरागमन करत आहे. हार्दिक पांड्याही ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुनरागमन करणार आहे. रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्ध १३ सामन्यांत ५०.४४च्या सरासरीनं धावा चोपल्या आहेत आणि त्यात दोन शतकांचा समावेश आहे. प्रसिद्ध कृष्ण व कृणाल पांड्या यांचा वन डे संघातील समावेश सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. मोहम्मद सिराज व सूर्यकुमार यादव यांनाही संधी मिळाली आहे.
पृथ्वी शॉ व देवदत्त पडीक्कल यांना स्थान नाहीनुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉ व देवदत्त पडीक्कल यांनी धमाकेदार कामगिरी केली. पृथ्वी शॉ हा विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात ८०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. त्यानं ८ सामन्यांत १६५.४० च्या सरासरीनं ८२७ धावा. त्यानं १ द्विशतक, ३ शतकं आणि १ अर्धशतक झळकावली. देवदत्त पडीक्कलनंही ७३७ धावा चोपल्या होत्या. पृथ्वी शॉनं कुटल्या ८ सामन्यांत ८२८ धावा; कॅपवरील 'त्या' नावात शोधू लागलेत यशाचं रहस्य, Photo Viral
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर. TEAM - Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, Shubman Gill, Shreyas, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), KL Rahul (wk), Y Chahal, Kuldeep Yadav, Krunal Pandya, W Sundar, T Natarajan, Bhuvneshwar Kumar, Md. Siraj, Prasidh Krishna, Shardul Thakur.