IND vs NZ 1st ODI Live : शिखर धवन, शुमबन गिल ९ चेंडूंत एकापाठोपाठ माघारी परतले; न्यूझीलंडने डोकं वर काढले

India vs New Zealand 1st ODI Live : भारतीय संघ आगामी २०२३च्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 08:55 AM2022-11-25T08:55:25+5:302022-11-25T08:56:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ 1st ODI Live : Shikhar Dhawan goes for 72 in 77 balls, Shubman Gill departs for 50 in 65 balls - 124 runs opening partnership ends | IND vs NZ 1st ODI Live : शिखर धवन, शुमबन गिल ९ चेंडूंत एकापाठोपाठ माघारी परतले; न्यूझीलंडने डोकं वर काढले

IND vs NZ 1st ODI Live : शिखर धवन, शुमबन गिल ९ चेंडूंत एकापाठोपाठ माघारी परतले; न्यूझीलंडने डोकं वर काढले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand 1st ODI Live : भारतीय संघ आगामी २०२३च्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. त्यामुळेच रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली जात आहे. शिखर धवनच्या खांद्यावर या खेळाडूंना घडविण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका त्यादृष्टीनेच भारतासाठी खास आहे आणि यात धवनसह शुबमन गिल हा युवा फलंदाज सलामीची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना दिसतोय. ट्वेंटी-२०त बाकावर बसवून ठेवलेल्या संजू सॅमसनला अखेर वन डेत संधी दिली गेली. 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात अर्शदीप सिंग किंवा उम्रान मलिक यांच्यापैकी कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता होती, परंतु आज दोघंही पदार्पण करत आहेत. शिखऱ धवन व शुबमन गिल ही जोडी सलामीला येणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, सूर्याकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल व उम्रान मलिक अशी टीम आहे. 

- २०१९च्या वर्ल्ड कप फायनलनंतर केन विलियम्सन केवळ सहा वन डे सामना खेळला आहे, परंतु त्याचा स्ट्राईक रेट ५६.१६ राहिला आहे.  

- वन डे क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात भारताकडून सर्वाधिक २१ विकेट्स ( ११ सामने) युजवेंद्र चहलच्या नावावर आहेत.  
 


शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीने भारताला दमदार सुरूवात करून दिली. गिलला जीवदान मिळाले आणि त्याचा त्यांनी फायदा उचलताना अर्धशतक झळकावले. धवननेही अर्धशतकी खेळी करताना लिस्ट ए क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पार केला. या जोडीला २४व्या षटकात नजर लागली. ल्युकी फर्ग्युसनच्या षटकात पहिल्याच चेंडूवर शुबमन झेलबाद झाला. त्याने ६५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह ५० धावा केल्या. पाठोपाठ नवव्या चेंडूवर ( २४.३ ) धवन बाद झाला. टीम साऊदीने ही विकेट घेतली आणि भारताचे दोन्ही सलामीवीर १२४ धावांवर माघारी परतले. धवनने ७७ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या.

साऊदीची ही वन डे क्रिकेटमधील २०० वी विकेट ठरली.  डॅनिएल व्हिटोरी ( २९७), कायले मिल्स ( २४०), ख्रिस हॅरीस ( २०३) व ख्रिस क्रेन्स ( २००) यांच्यानंतर किवींसाठी साऊदीने हा पराक्रम केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs NZ 1st ODI Live : Shikhar Dhawan goes for 72 in 77 balls, Shubman Gill departs for 50 in 65 balls - 124 runs opening partnership ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.