India vs New Zealand 1st ODI Live : भारतीय संघ आगामी २०२३च्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. त्यामुळेच रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली जात आहे. शिखर धवनच्या खांद्यावर या खेळाडूंना घडविण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका त्यादृष्टीनेच भारतासाठी खास आहे आणि यात धवनसह शुबमन गिल हा युवा फलंदाज सलामीची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना दिसतोय. ट्वेंटी-२०त बाकावर बसवून ठेवलेल्या संजू सॅमसनला अखेर वन डेत संधी दिली गेली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात अर्शदीप सिंग किंवा उम्रान मलिक यांच्यापैकी कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता होती, परंतु आज दोघंही पदार्पण करत आहेत. शिखऱ धवन व शुबमन गिल ही जोडी सलामीला येणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, सूर्याकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल व उम्रान मलिक अशी टीम आहे.
- २०१९च्या वर्ल्ड कप फायनलनंतर केन विलियम्सन केवळ सहा वन डे सामना खेळला आहे, परंतु त्याचा स्ट्राईक रेट ५६.१६ राहिला आहे.
- वन डे क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात भारताकडून सर्वाधिक २१ विकेट्स ( ११ सामने) युजवेंद्र चहलच्या नावावर आहेत.
साऊदीची ही वन डे क्रिकेटमधील २०० वी विकेट ठरली. डॅनिएल व्हिटोरी ( २९७), कायले मिल्स ( २४०), ख्रिस हॅरीस ( २०३) व ख्रिस क्रेन्स ( २००) यांच्यानंतर किवींसाठी साऊदीने हा पराक्रम केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"