मुंबई - न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात काही युवा चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. तर शुभमन गील याला पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याबरोबरच दुखापतग्रस्त इशांत शर्मालाही संघात स्थान देण्यात आले आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्यापाठोपाठ रोहित शर्माही दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याच्या मध्यावर मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत आज निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ याने दीर्घकाळानंतर कसोटी संघात पुनरागमन केले आहे. तर युवा फलंदाज शुभमन गिल याचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याबरोबरच युवा गोलंदाज नवदीप सैनी यालाही कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तर दुखापतग्रस्त इशांत शर्माचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र तो तंदुरुस्त झाल्यास त्याचे संघातील स्थान निश्चित करण्यात येईल.
NZ vIND : Team India ला मोठा धक्का; वन डे, कसोटी मालिकेतून प्रमुख खेळाडूची माघार
विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान
विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणेभारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा (तंदुरुस्त झाल्यास)