आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर एकदिवसीय विश्वचषक-2023 च्या उपांत्य फेरीत किंग कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 113 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी केली. महत्वाचे म्हणजे कोहलीने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रथमच शतक झळकावण्याचा पराक्रम तर केलाच, पण एकदिवसीय सामन्यात 50 वे शतक झळकावत महाविक्रमाचीही नोंद केली. या खेळीच्या जोरावर त्याने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा 20 वर्षांपूर्वीचा जुना विक्रमही मोडला. यानंतर, महेला जयवर्धनेला मागे टाकत तो विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाजही ठरला होता. मात्र त्याचा हा विक्रम फार तर फार साडेतीन तासच टिकू शकला.
फक्त साडेतीन तासच टिकला कोहलीचा विक्रम! -
विराट कोहली न्यूझीलंड विरुद्ध 117 धावांची खेळी करून एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज झाला होता. मात्र त्याचा हा विक्रम फार-फार तर केळव साडेतीन तासच टिकू शकला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या नावे होता. त्यांने 2007 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 115 धावांची खेळी केली होती. पण आता हा विक्रम न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलच्या नावावर गेला आहे. मिचेलने आजच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 134 धावांची खेळी करून हा विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. त्याने 119 चेंडूंत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 134 धावा केल्या.
एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सर्वोच्च धावसंख्या-
134 धावा - डॅरिल मिचेल VS भारत
117 धावा – विराट कोहली VS न्यूझीलंड, 2023
115 धावा – महेला जयवर्धने VS न्यूझीलंड, 2007
115 धावा – ग्राहम गूच VS भारत, 1987
113 धावा – सईद अनवर VS न्यूझीलंड, 1999
111* धावा – सौरव गांगुली VS केनिया, 2003
105 धावा – स्टीव स्मिथ VS भारत, 2015
एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताकडून सर्वोच्च धावसंख्या -
117- विराट कोहली VS न्यूझीलंड, 2023
105- श्रेयस अय्यर VS न्यूझीलंड, 2023
111*- सौरव गांगुली VS केनिया, 2003
85- सचिन तेंडुलकर VS पाकिस्तान, 2011
83- सचिन तेंडुलकर VS केनिया, 2003
77- रवींद्र जडेजा VS न्यूझीलंड, 2019
65- सचिन तेंदुलकर VS श्रीलंका, 1996
65- एमएस धोनी VS ऑस्ट्रेलिया, 2015
Web Title: Ind vs nz semi final 2023 virat kohli broke Ganguly's 20-year-old record but it lasted only three and a half hours and Now Daryl Mitchell top scored 134
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.