IND vs SA, 1st ODI : क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video 

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यानंही पहिल्या वन डेत धोनी स्टाईल स्टम्पिंग करून भारताच्या रिषभ पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. क्विंटनची चपळता पाहून नेटिझन्सना धोनीची आठवण झाली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 01:13 PM2022-01-20T13:13:25+5:302022-01-20T13:13:49+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 1st ODI : Quinton de Kock or MS Dhoni? SA wicket-keeper's stumping to dismiss Rishabh Pant, Watch Video | IND vs SA, 1st ODI : क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video 

IND vs SA, 1st ODI : क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, Quinton de Kock : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम १० स्टम्पिंग बघितल्या, तर त्यापैकी पाच स्टम्पिंग या महेंद्रसिंग धोनीनं केलेल्या दिसतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीनं यष्टिंमागे दमदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक यानंही पहिल्या वन डेत धोनी स्टाईल स्टम्पिंग करून भारताच्या रिषभ पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. क्विंटनची चपळता पाहून नेटिझन्सना धोनीची आठवण झाली.  

दक्षिण आफ्रिकेनं उभ्या केलेल्या २९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  शिखर धवन व विराट कोहली  यांनी ९२ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला होता. पण, दोघंही बाद झाले अन् भारताच्या मधल्या फळीला अपयश आले. रिषभ पंत १६ धावांवर यष्टिचीत झाला. फेहलुकवायोच्या गोलंदाजीवर डोळ्याची पापणी हलण्यापूर्वी क्विंटन डी कॉकनं सुरेखरित्या रिषभला यष्टिचीत केलं.  

पाहा व्हिडीओ...

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीन विकेट्स ६८ धावांवर पडल्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( Rassie van der Dussen) यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. टेम्बा बवुमा १४३ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीनं ११० धावांवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बवुमानं चौथ्या विकेटसाठी ड्यूसेनसह २०४ धावांची भागीदारी केली. ड्यूसेन ९६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह १२९ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेनं ४ बाद २९६ धावांचा डोंगर उभा केला.  भारताकडून शिखर धवननं सर्वाधिक ७९ धावा केल्या. विराट कोहली व शार्दूल ठाकूर यांनी अर्धशतकी खेळी केली, परंतु २९६ धावांच्या पाठलाग करताना भारताला २६५ धावाच करता आल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनी शरणागती पत्करली.  
 

Web Title: IND vs SA, 1st ODI : Quinton de Kock or MS Dhoni? SA wicket-keeper's stumping to dismiss Rishabh Pant, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.