IND vs SA, 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात सध्यातरी यजमानांनी मजबूत पकड घेतलेली पाहायला मिळत आहे. लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, लोकेश, रिषभ पंत व शार्दूल ठाकूर वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी निराश केले आणि आफ्रिकेसमोर ते २८८ धावांचेच लक्ष्य ठेवू शकले. भारतीय संघ ३०० पार झेप घेईल असे वाटत असताना क्विंटन डी कॉकनं (Quinton De Kock) यष्टिंमागे कमाल केली आणि विजेच्या वेगानं स्टम्पिंग करून वेंकटेश अय्यरला माघारी जाण्यास भाग पाडले.
भारताच्या डावातील ४४ व्या षटकात अँडिले फेलुकवायोच्या गोलंदाजीवर क्विंटननं स्टम्पिंग केले. फेलुकवायोनं पाचवा चेंडू लेग स्टम्पच्या दिशेनं फेकला आणि त्यावर वेंकटेश अय्यर पुढे आला होता. तितक्यात क्विंटननं तो चेंडू टिपून वेगानं स्टम्पिंग केले. वेंकटेशनं ३३ चेंडूंत २२ धावा केल्या. पहिल्या सामन्यात क्विंटननं अशाच पद्धतीनं रिषभ पंतला बाद केले होते.
पाहा व्हिडीओ...
त्यानंतर क्विंटननं खणखणीत षटकार खेचला. आफ्रिकेनं ८ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या आणि त्यापैकी ४० धावा या क्विंटनच्या होत्या. आफ्रिकेच्या सहज धावा होत होत्या, त्यात १०व्या षटकात भारतानं एक DRS गमावला. क्विंटननं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. क्विंटन व मलान यांनी १५ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या.