India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), रिले रोसोवू ( Rilee Rossouw) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) या डावखुऱ्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला. क्विंटनला शून्यावर जीवदान देणे खूप महाग पडले. रोसोवूने ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. २०व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मिलरने सलग तीन षटकार खेचून आफ्रिकेला ३ बाद २२७ धावांपर्यंत पोहोचवले. याच षटकात एक असा प्रसंग घडला की ज्याने दीपक चहरने ( Deepak Chahar) सहकारी मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याच्याप्रती अपशब्द वापरले. रोहित शर्मानेही हात जोडले.
कर्णधार टेम्बा बवुमा ( ३) पुन्हा अपयशी ठरला. क्विंटन व रोसोवू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. क्विंटनने भारताविरुद्ध ट्वेंटी-२०तील चौथे अर्धशतक झळकावले. क्विंटन ४३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावांवर रन आऊट झाला. रोसोवूने ट्वेंटी-२० तील त्याचे पहिले शतक ४८ चेंडूत झळकावले. रोसोवू व स्टब्स ( २३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली.
Deepak Chahar ने वॉर्निंग देऊन सोडले, Mumbai Indiasच्या युवा खेळाडूने मग फटके मारले, Video
मागच्या सामन्यातील शतकवीर डेव्हिड मिलरने दुसऱ्याच चेंडूवर उत्तुंग षटकार खेचून चेंडू स्टेडियमबाहेर पाठवला. चहरचा तो चेंडू नो बॉल ठरला. मिलरने फ्री हिटचा चेंडूही षटकार खेचला. पुढच्या चेंडूवर सिराजने झेल टिपला, परंतु त्याचा पाय सीमारेषेला लागल्याने आफ्रिकेला सलग तिसरा षटकार मिळाला. यावेळी दीपकचा पारा चढला आणि त्याने शिवी दिली.
त्या षटकात २४ धावा आल्याने आफ्रिकेच्या ३ बाद २२७ धावा झाल्या. रोसोवू ४८ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने ५ चेंडूंत १९ धावा कुटल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SA 3rd T20I Live Updates : Rohit Sharma folding hand, Deepak Chahar spotted abusing Mohammed Siraj for stepping on boundary line while taking a catch, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.