India vs South Afrida 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेने उभा केलेला धावांचा डोंगर सर करताना भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा व श्रेयस अय्यर हे अवघ्या ४ धावांवर माघारी परतले. रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना धावांचा वेग वाढवला. कार्तिकने मिळालेल्या संधीचं सोनं करताना पॉवर प्लेमध्ये १६ चेंडूंत ३३ धावा चोपल्या. त्याची खेळी ४६ धावांवर संपुष्टात आली. फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव आज पुन्हा दमदार खेळ करेल असा विश्वास होता, परंतु त्रिस्तान स्टब्सने ( Tristan Stubbs) अफलातून झेल घेत त्याला माघारी पाठवले. भारताचे ६ फलंदाज १०८ धावांत माघारी परतले.
रोहितने हात जोडले, Deepak Chahar ने अपशब्द वापरले; नेमके Mohammed Sirajने असे काय केले?
क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), रिले रोसोवू ( Rilee Rossouw) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) या डावखुऱ्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला. क्विंटनला शून्यावर जीवदान देणे खूप महाग पडले. रोसोवूने ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. २०व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मिलरने सलग तीन षटकार खेचून आफ्रिकेला ३ बाद २२७ धावांपर्यंत पोहोचवले. कर्णधार टेम्बा बवुमा ( ३) पुन्हा अपयशी ठरला. क्विंटन व रोसोवू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. क्विंटन ४३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावांवर रन आऊट झाला. रोसोवू व त्रिस्तान स्टब्स ( २३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. मिलरने २०व्या षटकात सलग तीन षटकार खेचले. त्याने टोलावलेला पहिला चेंडू स्टेडियमबाहेर गेला. रोसोवू ४८ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने ५ चेंडूंत १९ धावा कुटल्या.
कागिसो रबाडाने पहिल्याच षटकार रोहित शर्माचा ( ०) त्रिफळा उडवला. त्यानंतर वेन पार्नेलने अप्रतिम चेंडूवर श्रेयस अय्यरला ( १) LBW केले. २ बाद ४ अशा धावांवरून रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांनी भारताला सावरले. लुंगी एनगिडीने टाकलेल्या पाचव्या षटकात रिषभने ४, ०, ६, ४, ६ अशा २० धावा चोपल्या, परंतु अखेरच्या चेंडूवर तो स्टब्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रिषभने १४ चेंडूंत २७ धावा केल्या. त्यानंतर पुढील षटकात कार्तिकने ६,४,६ अशी आतषबाजी करताना १९ धावा कुटल्या. कार्तिक आज कुणाला ऐकत नव्हता. त्याने केशव महाराजने टाकलेल्या सातव्या षटकात सलग दोन षटकार खेचले, परंतु महाराजने त्याचा त्रिफळा उडवला. कार्तिक २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा करून माघारी परतला. फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवचा ८ धावेवर स्टब्सने अफलातून झेल टिपला अन् भारताचा निम्मा संघ ८६ धावांत माघारी परतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"